HMD ग्लोबल ने Nokia 5.1 आणि Nokia 2.1 भारतात केले लॉन्च
Nokia 5.1, Nokia 2.1 आणि Nokia 3.1 चे 3GB रॅम वेरिएंट चा सेल 12 ऑगस्ट पासून सुरू होईल.
HMD ग्लोबल 21 ऑगस्ट ला भारतात लॉन्च चे आयोजन करत आहे, Nokia 6.1 Plus (Nokia X6) लॉन्च केला जाऊ शकतो. HMD ग्लोबल ने या लॉन्च इवेंट च्या आधी भारतात दोन नवीन स्मार्टफोन Nokia 5.1 आणि Nokia 2.1 किंवा क्रमश: Nokia 5 (2018) आणि Nokia 2 (2018) लॉन्च केले आहेत. त्याचबरोबर कंपनी ने Nokia 3.1 चा 3GB रॅम वेरिएंट पण सादर केला आहे.
Nokia 5.1
Nokia 5.1 मध्ये 5.5 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 2160 x 1080 पिक्सल आणि आस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे आणि डिवाइस मध्ये ओक्टा-कोर मीडियाटेक MT6755S SoC, 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे तसेच डिवाइस ची स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रो SD कार्ड स्लॉट पण देण्यात आला आहे.
कॅमेरा डिपार्टमेंट पाहता डिवाइस च्या रियर पॅनल वर 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. जो PDAF, LED फ्लॅश सोबत येतो आणि डिवाइस च्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. डिवाइस मध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि हा एंड्राइड वन डिवाइस असल्यामुळे एंड्राइड ओरियो वर चालतो.
Nokia 2.1
Nokia 2.1 मध्ये 5.5 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रेजोल्यूशन 1280 x 720 पिक्सल आहे आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 16:9 आहे तसेच याला अॅन्टी-FP कोटिंग पण करण्यात आली आहे. स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर आणि 1GB रॅम आहे.
ऑप्टिक्स बद्दल बोलायचे झाले तर या एंट्री लेवल फोन मध्ये 8 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो ऑटो फोकस आणि LED फ्लॅश सह येतो, त्याचबरोबर डिवाइस च्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. डिवाइस मध्ये 8GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रो SD कार्ड ने 128GB पर्यंत वाढवता येते. या डिवाइस मध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे जी 2 दिवसांची बॅटरी लाइफ देते.
किंमत आणि उपलब्धता
Nokia 5.1 14,499 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, तर Nokia 2.1 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल आणि डिवाइसचा सेल 12 ऑगस्ट पासून मोबाइल ऑफलाइन स्टोर्स, Paytm मॉल आणि Nokia च्या ऑनलाइन स्टोर्स वर सुरू होईल. Nokia 3.1 चा 3GB रॅम वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.