HMD ग्लोबल घेऊन येत आहे सर्व Nokia स्मार्टफोन्स साठी एंड्राइड 9 पाई
येत्या महिन्यात Nokia च्या सर्व स्मार्टफोन्सना एंड्राइड 9 पाई वर अपडेट करण्यात येईल.
HMD ग्लोबल ने स्पष्ट केले आहे की Nokia ब्रँड चे सर्व स्मार्टफोन्स एंड्राइड 9 पाई वर अपडेट केले जातील. HMD ग्लोबल ने MWC 2017 मध्ये ग्लोबली आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च करताना घोषणा केली होती की सर्व डिवाइसना वेळेवर सॉफ्टवेर अपडेट देण्यात येतील.
कंपनी ने घोषणा केली आहे की सर्व नोकिया स्मार्टफोन्स एंड्राइड 9 पाई वर अपडेट केले जातील. कंपनी ने येत्या काही महिन्यात ज्या स्मार्टफोन्सना नवीन OS वर अपडेट केले जाणार आहे त्यांची माहिती दिली आहे.
HMD ग्लोबल ने स्पष्ट केले आहे की एंड्राइड ओरियो गो एडिशन वर आधारित Nokia 1, Nokia 2 आणि Nokia 2.1 ला एंड्राइड 9 पाई वर अपडेट करण्यात येईल. कंपनी ने याचा पण खुलासा केला आहे की Nokia 3, Nokia 3.1, Nokia 5, Nokia 5.1, Nokia 6, Nokia 6.1, Nokia 6.1 Plus, Nokia 7, Nokia 7 plus, Nokia 8, Nokia 8 Sirocco, Nokia X6 आणि Nokia X5 ला पण नवीन एंड्राइड वर अपडेट करण्यात येईल जे एंड्राइड वन प्लॅटफार्म वर आधारित डिवाइस आहेत.
Nokia 7 plus या लिस्ट मध्ये पहिला डिवाइस होता ज्याला एंड्राइड 9 बीटा अपडेट मिळाला होता. या स्मार्टफोनला आता एंड्राइड P बीटा 4 अपडेट मिळाला आहे, ज्यामुळे वाटते की हा कंपनी चा पहिला डिवाइस असेल ज्याला एंड्राइड 9 पाई चा अधिकृत बिल्ड मिळेल. त्यानंतर Nokia 8 Sirocco आणि Nokia 8 ला हा अपडेट मिळू शकतो जे कंपनी चे फ्लॅगशिप डिवाइस आहेत.