50MP फ्रंट कॅमेरासह HMD Crest आणि HMD Crest Max भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स 

50MP फ्रंट कॅमेरासह HMD Crest आणि HMD Crest Max भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स 
HIGHLIGHTS

HMD ब्रँडिंग अंतर्गत पहिले स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केले आहेत.

HMD Crest आणि HMD Crest Max हे दोन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत.

HMD चे दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आले आहेत.

HMD Global ने अखेर HMD ब्रँडिंग अंतर्गत पहिले स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केले आहेत. कंपनीने दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. HMD Crest आणि HMD Crest Max असे या नवीनतम स्मार्टफोन्सची नावे आहेत. या स्मार्टफोनमध्ये मोठ्या प्रमाणात समान फीचर्स समाविष्ट आहेत. हे नवीन फोन ग्लास बॅक पॅनलसह येतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात HMD Crest आणि HMD Crest Max ची भारतीय किंमत आणि इतर सर्व तपशील-

Also Read: Apple Watch for Kids: भारतात लहान मुलांसाठी नवीन स्मार्टवॉच लाँच, पालकांची होईल मोठी मदत

HMD Crest आणि HMD Crest Max ची भारतीय किंमत

HMD Crest फोनची किंमत 14,499 रुपये इतकी आहे. ही किंमत फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची आहे. याव्यतिरिक्त, HMD Crest Max च्या 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,499 रुपये आहे. HMD Crest ला रेड, पर्पल आणि ब्लु कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. तर, मॅक्स मॉडेल ब्लू, रेड आणि व्हायलेट कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

HMD Crest आणि HMD Crest Max ची उपलब्धता

HMD Crest आणि HMD Crest Max फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे स्मार्टफोन Amazon आणि HMD.com वरून खरेदी करता येतील. लेटेस्ट स्मार्टफोनची विक्री पुढील महिन्यात Amazon Great Freedom Sale दरम्यान सुरू होईल. सेलदरम्यान हे स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करता येतील.

HMD Crest चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

HMD Crest फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा फोन Unisoc T760 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट आहेत. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP फ्रंट कॅमेरा आहे.

फ्रंट कॅमेरा सुपर नाईट + ट्रायपॉड मोड, फ्लॅशशॉट, एआय एचडीआर, स्किन टोन ऑप्टिमायझेशन, सेल्फी जेश्चर आणि बरेच काही यासह अनेक उत्कृष्ट फीचर्ससह येतो. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

HMD Crest आणि HMD Crest Max भारतात लाँच

HMD Crest Max चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

HMD Crest Max फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. हा फोन देखील Unisoc T760 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट आहेत. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 64MP प्राथमिक कॅमेरा आणि 50MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही फोनसोबत तुम्हाला रिपेअरचा पर्याय मिळतो. म्हणजे फोनचा तुटलेला डिस्प्ले, वाकलेला चार्जिंग पोर्ट आणि डेड बॅटरी तुम्ही सहजपणे दुरुस्त करू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo