Hey Barbie! रेट्रो डिझाईनसह HMD चा फ्लिप फोन भारतात लाँच, अगदी बजेटमध्ये आहे किंमत

Updated on 21-Mar-2025
HIGHLIGHTS

HMD Barbie Phone अखेर भारतात लाँच झाला आहे.

HMD Barbie Phone कंपनीने अगदी कमी किमतीत भारतात लाँच केला आहे.

HMD बार्बी फोनमध्ये रेट्रो-फ्लिप स्टाईल डिझाइन आणि इतर आकर्षक फीचर्स उपलब्ध आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जागतिक स्तरावर पहिल्यांदा सादर करण्यात आलेला HMD Barbie Phone अखेर भारतात लाँच झाला आहे. विशेष म्हणजे कस्टमाइज करण्यासाठी या फ्लिप फोनमध्ये दोन बदलण्यायोग्य बॅक कव्हर, स्टिकर्स, क्रिस्टल्स आणि बार्बी चार्म्ससह बिडेड डोरी आहे. HMD बार्बी फ्लिप फोनमध्ये युजर्स फक्त कॉलिंग, मेसेजिंग आणि इतर मूलभूत कार्यांसह येतात. हा फोन कंपनीने अगदी कमी किमतीत भारतात लाँच केला आहे, जो प्रत्येकाच्या बजेटमध्ये येतो. जाणून घेऊयात HMD Barbie Phone ची किंमत आणि स्पेक्स-

Also Read: Price Drop! नवा फोन लाँच होताच Google Pixel 8a फोन झाला स्वस्त, फक्त एवढीच राहिली किंमत

HMD Barbie Phone ची किंमत

HMD Barbie Phone ची किंमत 7,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. HMD Barbie Phone आता कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदीसाठी उपलब्ध आहे. बार्बी फोन असल्यामुळे अर्थातच हा फोन पॉवर पिंक कलरसह उपलब्ध आहे.

HMD Barbie Phone with flip design launched top 5 features priceHMD Barbie Phone with flip design launched top 5 features price

HMD Barbie Phone ची डिझाईन

HMD बार्बी फोनमध्ये रेट्रो-फ्लिप स्टाईल डिझाइन आहे. ज्यामध्ये, संपूर्ण फोनवर पिंक कलर उपलब्ध आहे. तसेच, या फोनमध्ये बार्बी थीम असलेला कीपॅड देखील आहे. लक्षात घ्या की, या फोनची बाह्य स्क्रीन आरसा म्हणून वापरली जाऊ शकते. S30+ ऑपरेटिंग सिस्टममध्ये मालिबू स्नेक, डिजिटल बॅलन्स टिप्स आणि बार्बी मेडिटेशन सारखी फीचर्स आहेत. याव्यतिरिक्त यात तुम्हाला कस्टम आयकॉन, वॉलपेपर आणि बार्बी रिंगटोन देखील मिळतील.

HMD Barbie Phone चे फीचर्स आणि स्पेक्स

HMD Barbie Phone मध्ये 2.8 इंच लांबीची QVGA अंतर्गत स्क्रीन आणि 1.77 इंच लांबीची आऊटर स्क्रीन देण्यात आली आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हा फोन Unisoc T107 प्रोसेसरसह कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या बार्बी फोनमध्ये 64MB रॅम आणि 128MP इंटरनल स्टोरेज आहे. ही स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 32GB पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी, HMD फोनमध्ये 0.3MP (VGA) कॅमेरा असून, यात टॉर्च लाईट देखील आहे. हा टॉर्च तुम्हाला नक्कीच फ्लॅश म्हणून वापरता येईल. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 1,450mAh बॅटरी आहे. तसेच, कनेक्टिव्हिटी यात LTE, ड्युअल-सिम, 3.5mm ऑडिओ जॅक, ब्लूटूथ 5.0 आणि USB टाइप-सी पोर्ट आहे. लक्षात घ्या, या फोनमध्ये कोणतेही लक्ष विचलित करणारे म्हणजेच सोशल मीडिया ऍप्स नाहीत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :