ह्यूमन मोबाईल डिव्हाइसेस म्हणजेच HMD ने भारतात त्यांचे दोन एंट्री-लेव्हल फीचर फोन अखेर लाँच केले आहेत. हे फोन HMD 130 Music आणि HMD 150 Music या नावाने सादर करण्यात आले आहेत. हे दोन्ही फीचर फोन खास म्युझिक लव्हर्ससाठी सादर करण्यात आले आहेत, असे बोलले जात आहे. ज्यामध्ये तुम्हाला म्युझिक कंट्रोल, लाऊड ऑडिओ आणि मोठी बॅटरी सारखी फीचर्स मिळणार आहेत.
Also Read: Motorola Edge 60 Fusion फोन अखेर भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स
नव्या फीचर्स फोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही या फीचर फोनद्वारे UPI पेमेंट करण्यास देखील सक्षम आहात. लवकरच कंपनी बाजारात एंट्री-लेव्हल 5G फोन आणण्याची तयारी करत आहे. जाणून घेऊयात नव्या फीचर्स फोनची किंमत आणि सर्व तपशील-
किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, हे दोन्ही फोन्स अगदी पॉकेट फ्रेंडली किमतीत लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने HMD 130 Music फोन 1,899 रुपयांना लाँच केला आहे. या फोनमध्ये तुम्हाला ब्लु, डार्क ग्रे आणि रेड कलर ऑप्शन्स मिळतात.
तर, दुसरीकडे HMD 150 म्युझिक 2399 रुपयांच्या किमतीत सादर करण्यात आला आहे. हा फोन लाईट ब्लू, पर्पल आणि ग्रे कलर ऑप्शनमध्ये लाँच केला गेला आहे.
वर सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही फोन्स खास म्युझिक लव्हर्ससाठी सादर करण्यात आले आहेत. या दोन्ही फोनमध्ये मोठे स्पीकर आहेत, ज्याद्वारे तुम्हाला उत्तम म्युझिक आणि कॉलिंग अनुभव मिळतो. त्याबरोबरच, या फोन्ससह तुम्हाला UPI पेमेंटचे सपोर्ट देखील मिळेल. याशिवाय, त्यात टेक्स्ट टू स्पीच सोल्यूशन देखील देण्यात आले आहे, जे हिंदी आणि इंग्रजीला सपोर्ट करते.
तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी हे फोन्स FM रेडिओ, FM रेकॉर्डिंग, ब्लूटूथ आणि SD कार्डला सपोर्ट करते. फोनची स्टोरेज 32GB पर्यंत वाढवता येते. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये बॅटरी 2500mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये टाइप-C चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन एकदा चार्ज केल्यावर 50 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक देईल. त्याबरोबरच, ही बॅटरी 36 तास स्टँडबायवर चालेल.