Hathway ने कोणत्याही FUP लिमिट विना आपल्या Rs 649 प्रतिमाह मध्ये येणाऱ्या प्लानची घोषणा केली आहे, हा रिचार्ज प्लान 125Mbps स्पीड सह येतो.
Hathway देशातील एक मोठी ब्रॉडबँड कंपनी आहे आणि त्यांनी हैदराबाद मध्ये आपली संपूर्ण टॅरिफ लाइनअप बदलली आहे. विशेष म्हणजे कंपनी कडे एक Rs 349 मध्ये येणार प्लान आधीपासूनच आहे, पण आता कंपनी ने आपले काही नवीन प्लान्स या शहरात Rs 399 ते Rs 699 दरम्यान लॉन्च केले आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो कि Rs 399 वाल्या ब्रॉडबँड प्लान मध्ये तुम्हाला 25Mbps चा स्पीड मिळत आहे, तसेच जर Rs 649 वाल्या ब्रॉडबँड रिचार्ज प्लान बद्दल बोलायचे झाले तर हा तुम्हाला 125Mbps चा स्पीड ऑफर करत आहे. या प्लान मध्ये तुम्हाला हा डाउनलोड आणि अपलोड स्पीड मिळत आहे. याव्यतिरिक्त या सर्व प्लान्स मध्ये तुम्हाला अनलिमिटेड FUP मिळत आहे. याचा अर्थ असा आहे कि स्पीड बद्दल कोणतीही मर्यादा नसेल.
एवढं मात्र लक्षात असू द्या कि हा ब्रॉडबँड रिचार्ज प्लान फक्त हैदराबाद सिटी मधेच तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तसेच शहरात लवकरच 3000Mbps स्पीड वाला प्लान लॉन्च केला जाऊ शकतो जो अजून पर्यंत इथे आलेला नाही.
Hathway रिचार्ज प्लान्स बद्दल संपूर्ण माहिती
आम्ही सांगितले आहे कि हैदराबाद मध्ये Hathway ने आपल्या Rs 349 पासून Rs 699 पर्यंत येणारे प्लान्स लॉन्च केले आहेत. जर छोट्या प्लान म्हणजे Rs 349 मध्ये येणाऱ्या प्लानची चर्चा करायची झाल्यास हा तुम्ही एका हाथवे सुपर प्लान प्रमाणे घेऊ शकता, तसेच यात तुम्हाला कोणत्याही FUP लिमिट विना 25Mbps ची स्पीड लिमिट मिळत आहे. तसेच हा प्लान तुम्ही 6 महिन्यासाठी Rs 2,394 आणि 12 महिन्यासाठी Rs 4,500 मध्ये घेऊ शकता.