Google चे आगामी स्मार्टफोन्स म्हणजे Google Pixel 3 स्मार्टफोन्स 9 ऑक्टोबरला लॉन्च केले जाऊ शकतात. पण जरी अजून हे गूगल स्मार्टफोन्स लॉन्च होण्यास अवकाश असला तरी त्या आधी Google ने एक टीजर शेयर केला आहे, जो कंपनीच्या जपानी वेबसाइट वर दिसला आहे. तिथून हिंट मिळत आहे की गूगल चे आगामी फोन्स नवीन मिंट ग्रीन कलर ऑप्शन मध्ये पण लॉन्च केले जाऊ शकतात.
जर गूगल च्या आगामी फोन्स म्हणजे गूगल Pixel 3 आणि गूगल Pixel 3 XL चा टीजर पाहिल्यास लक्षात येते की हे दोन्ही आगामी गूगल फोन्स नवीन एक्वा किंवा मिंट ग्रीन रंगच्या ऑप्शन मध्ये पण लॉन्च केले जाऊ शकतात. त्याचबरोबर स्मार्टफोन्स नेहमीप्रमाणे ब्लॅक आणि क्लियर वाइट रंगांत पण लॉन्च केले जाऊ शकतात. तसेच तुम्ही फोटो मध्ये बघितले असेल की गूगल ने ब्लॅक आणि वाइट रंग जास्त हाईलाइट केला आहे.
आता जर Google Pixel 3 XL बद्दल बोलायचे झाले तर या फोन विषयी खुप काही समोर आले आहे. Pixel 3 XL मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले असेल ज्याचे रेजोल्यूशन 1440×2960 पिक्सल असेल, जो खुप मोठा आहे. फोन मध्ये 3,430mAh ची बॅटरी देण्यात येईल. गूगल च्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये एक 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असेल. रेजोल्यूशन गेल्यावर्षीच्या फोन्स सारखाच असेल पण फक्त लुक वरून काही सांगता येत नाही. सेंसर्स, पिक्सल्स आणि फीचर्स अधिक असू शकतात आणि इतर फीचर्स पण सामिल केले जाऊ शकतात.
डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 SoC सह लॉन्च केला जाईल आणि याचा बेस वेरिएंट Pixel 3 XL 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह येईल. डिवाइस मध्ये ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचर पण असेल.