Google Pixel Fold ची लॉन्चिंग कन्फर्म, टीझरमध्ये बघा काय मिळेल खास ?

Updated on 05-May-2023
HIGHLIGHTS

Google ने Pixel Fold संदर्भात एक टीझर जारी केला.

Google आपला नवीन फोन Pixel 7a देखील सादर करणार

10 मे रोजी Google चा Google I/O 2023 इव्हेंट

अखेर Google ने Pixel Fold स्मार्टफोनबद्दल अधिकृत पुष्टी केली आहे. गुगलचा पहिला फोल्डेबल फोन Pixel Fold या महिन्यात लाँच होणार आहे. हा फोन 10 मे रोजी Google च्या Google I/O 2023 मध्ये लाँच केला जाईल. 10 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात Google आपला नवीन फोन Pixel 7a देखील सादर करणार आहे.

Google Pixel Fold चा टीजर जारी

Google ने Pixel Fold संदर्भात एक टीझर जारी केला आहे. यामध्ये Pixel Fold मध्ये तीन रियर कॅमेरे दिसत आहे. इनर स्क्रीनसह मोठे बेझल उपलब्ध असतील. बेझलच्या वरचा कॅमेरा देखील टीझरमध्ये पाहता येत आहे. Pixel Fold टीजर व्हीडिओ तुम्ही खाली बघू शकता. 

 

https://twitter.com/madebygoogle/status/1654170933417086978?ref_src=twsrc%5Etfw

 

Google Pixel Fold चे लीक्स

लीकनुसार, Pixel Fold मध्ये 7.6-इंच लांबीची स्क्रीन मिळेल. स्क्रीन रिझोल्यूशन 1840×2208 पिक्सेल असेल. त्याबरोबरच, 120Hz च्या रिफ्रेश रेटसह OLED डिस्प्ले मिळणार आहे. या फोनला IPX8 रेटिंग मिळाली आहे. फोनची सेल 27 जूनपासून सुरू होईल, अशी माहिती मिळाली आहे. 

 

फोटोग्राफीसाठी Pixel Fold मध्ये 48MP प्राइमरी लेन्स असू शकतो. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS उपलब्ध असण्याची शक्यता आहे. दुसरा लेन्स 10.8MP चा अल्ट्रा वाइड अँगल असेल. यामध्ये तिसरा लेन्स 10.8MP चा टेलीफोटो लेन्स असणारे आहे, ज्यामध्ये 20x सुपर रेझ्युम झूम उपलब्ध असेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :