प्रतीक्षा संपली! आगामी Google Pixel Eventची तारीख जाहीर, लाँच होणार ‘हे’ जबरदस्त नवे प्रोडक्ट्स
Google ने आपल्या मोठ्या कार्यक्रमाची तारीख जाहीर केली आहे.
ब्रँडचा वार्षिक Pixel इव्हेंट येत्या ऑक्टोबर महिन्याच्या 4 तारखेला होणार आहे.
स्पेशल गुगल इव्हेंटमध्ये Pixel 8, Pixel 8 Pro आणि Pixel Watch 2 सारखे काही डिवाइस लाँच केले जाऊ शकतात.
जगातील सर्वात प्रसिद्ध टेक कंपनी Google ने आपल्या मोठ्या कार्यक्रमाची तारीख जाहीर केली आहे. यामध्ये कंपनी आपल्या Pixel पोर्टफोलिओची अनेक प्रोडक्ट्स लाँच करू शकते. ज्यामध्ये Pixel 8, Pixel 8 Pro आणि Pixel Watch 2 देखील सादर केले जाऊ शकतात. याबाबत कंपनीकडून निमंत्रणेही पाठवली जात आहेत. चला तर मग या इव्हेंटबद्दल जरा तपशीलवार माहिती घेऊयात.
Google Pixel Event
Google ने आज जाहीर केले की, ब्रँडचा वार्षिक Pixel इव्हेंट येत्या ऑक्टोबर महिन्याच्या 4 तारखेला होणार आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच याचे आयोजन 'न्यूयॉर्क'मध्ये केले जात आहे. जे स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता यूट्यूब आणि Google स्टोअर वेबसाइटवर लाईव्ह पाहता येईल. या कार्यक्रमाची जाहिरातही सोशल मीडियावर टाकण्यात आली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, या स्पेशल गुगल इव्हेंटमध्ये Pixel 8, Pixel 8 Pro आणि Pixel Watch 2 सारखे काही डिवाइस लाँच केले जाऊ शकतात.
Pixel event invites also just went out. We are descending into the most fun time of the year pic.twitter.com/RZfpm4u6OZ
— Marques Brownlee (@MKBHD) August 30, 2023
आगामी स्मार्टफोन सिरीजबद्दल थोडक्यात
Google ने चुकून Google Store वेबसाइटवर “Google Subscriptions and Services” च्या प्रोमो पेजवर Pixel 8 Pro ची इमेज शेअर केली होती. मात्र, कंपनीने नंतर ही इमेज काढून टाकली, अशी माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमेजमध्ये डिव्हाइस पोर्सिलेन कलर व्हेरिएंटमध्ये होते. इमेजमध्ये, एक व्यक्ती हातात फोन घेऊन बोलताना दिसत होता. डिव्हाइसमध्ये एक मोठा पिल शेपचा कॅमेरा मॉड्यूल आहे, जो Pixel 8 Pro कडे निर्देश करतो. कॅमेरा मॉड्यूलसह एक LED फ्लॅश आणि एक सेन्सर देखील आहे. याशिवाय, इमेजमधील व्यक्तीने एक वॉचदेखील घातली होती, जी Pixel Watch 2 असल्याचे मानले जात होते.
संभावित तपशील
Google Pixel 8 Pro मध्ये 6.7-इंच लांबीचा QHD + LTPO OLED डिस्प्ले मिळू शकतो. यावर 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले बॅटरीच्या लाईफशी तडजोड न करता हाय रिफ्रेश रेट दाखवतो. हा डिस्प्ले बहुतेक महागड्या फोनमध्ये बघायला मिळेल. नवीन Google Pixel 8 Pro मध्ये Google Tensor G3 चिपसेट आणि Titan सुरक्षा चिप दिली जाऊ शकते. Google Tensor ही एक सानुकूल-बिल्ट चिप आहे जी Pixel फोन जलद आणि अधिक बुद्धिमान बनवते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या फोनवर निरनिराळे कार्य सहज करता येतील.
नवीन मोबाइल Pixel 8 Pro मध्ये OIS, 64MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 48MP टेलिफोटो लेन्ससह 50MP प्राथमिक कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी 11MP कॅमेरा मिळू शकतो. अल्ट्रावाइड कॅमेरा सभोवतालचे डिटेल्स कॅप्चर करतात. ते फोटोंना एक मॅग्निफाईड लुक देखील देतात, जे एडिट आणि मोडद्वारे दुरुस्त केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, हे उपकरण 27W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,950mAh बॅटरीसह प्रदान केले जाऊ शकते. हा फोन Android 14 OS वर आधारित असू शकतो. फोनबद्दल सर्व माहिती अधिकृतपणे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile