Google Pixel 9a भारतात लाँच! ‘या’ फोनशी होतेय जोरदार स्पर्धा, जबरदस्त फीचर्सची सर्वत्र चर्चा

Updated on 20-Mar-2025
HIGHLIGHTS

Google Pixel 9a ची थेट स्पर्धा iPhone 16e सह होत आहे.

Google Pixel 9a फोन एकदा चार्ज केल्यानंतर 30 तासांपेक्षा जास्त काळ बॅटरी लाइफ देतो.

दोन्ही फोनमध्ये 48MP मेन प्रायमरी कॅमेरा उपलब्ध

Google ने नुकतेच Google Pixel 9a फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर 30 तासांपेक्षा जास्त काळ बॅटरी लाइफ देतो. हा फोन पिक्सेल 9 सिरीजचा सर्वात परवडणारा स्मार्टफोन आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Apple ने अलीकडेच आपला परवडणारा फोन iPhone 16e लाँच केला आहे. दरम्यान, Google Pixel 9a ची थेट स्पर्धा iPhone 16e सह होत आहे. जाणून घेऊयात किंमत आणि स्पेक्सची तुलना-

Also Read: Google Pixel 9a Launched: मोठा डिस्प्ले, अपग्रेडेड कॅमेरासह नवा फोन भारतात लाँच, जास्त नाहीये किंमत?

Google Pixel 9a आणि iPhone 16e ची किंमत

Google कंपनीच्या या लेटेस्ट फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या फोनची विक्री एप्रिलमध्ये सुरू होईल, परंतु नेमकी तारीख अद्याप पुढे आलेली नाही. दुसरीकडे, Apple चा हा नवीनतम iPhone फोन 128GB स्टोरजसह 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीच्या अधिकृत साइटव्यतिरिक्त, हा फोन Flipkart आणि Amazon वरून खरेदी करता येईल.

google pixel 9agoogle pixel 9a

Google Pixel 9a vs iPhone 16e

डिस्प्ले

Google Pixel 9a फोनमध्ये 6.3-इंच लांबीचा pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 60Hz ते 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. तुम्हाला हा फोन गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येतो. तर दुसरीकडे, iPhone 16e मध्ये 6.1-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले OLED तंत्रज्ञानासह आहे, जो व्हिडिओ पाहण्याचा, गेमिंगचा आणि वाचण्याचा उत्तम अनुभव देतो.

प्रोसेसर

Google च्या या नवीनतम हँडसेटमध्ये, 4थ जनरेशनच्या टेन्सर G4 चिपसेटसह कंपनीने टायटन M2 सिक्योरिटी को-प्रोसेसर देखील दिले आहे. दुसरीकडे, iPhone 16e डिव्हाइसमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Apple A18 बायोनिक चिपसेट उपलब्ध आहे.

कॅमेरा

Google Pixel 9a फोनच्या मागील बाजूस 48MP चा प्राथमिक कॅमेरा आणि 13MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तसेच, फोनमध्ये समोर 13MP चा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. दुसरीकडे, कंपनीने iPhone 16e च्या मागील बाजूस 48MP चा सिंगल कॅमेरा आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोन 12MP चा सेल्फी कॅमेरासह येतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :