Google Pixel 9a Launched: मोठा डिस्प्ले, अपग्रेडेड कॅमेरासह नवा फोन भारतात लाँच, जास्त नाहीये किंमत?

Google Pixel 9a Launched: मोठा डिस्प्ले, अपग्रेडेड कॅमेरासह नवा फोन भारतात लाँच, जास्त नाहीये किंमत?
HIGHLIGHTS

Google ने अखेर भारतात आपला Google Pixel 9a फोन लाँच केला आहे.

Google Pixel 9a हे या सिरीजमधील नवीनतम आणि परवडणारे मॉडेल आहे.

Google Pixel 9a ची किंमत आणि बँक ऑफर्स जाणून घेऊयात.

Google Pixel 9a Launched: दीर्घ प्रतीक्षेनंतर Google ने अखेर भारतात आपला Google Pixel 9a फोन लाँच केला आहे. हे Google Pixel 9 सिरीजमधील नवीनतम आणि परवडणारे मॉडेल आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Google Pixel 9A फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या फोनची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Realme P3 Ultra आणि Realme P3 5G भारतात लाँच! जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि सर्व स्पेक्स

Google Pixel 9a ची भारतीय किंमत

Google ने भारतात Google Pixel 9a फोन 49,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला आहे. ही किंमत या फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. लक्षात घ्या की, लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 3000 रुपयांची सूट मिळणार आहे. हा फोन आयरिस, ऑब्सिडियन, पियोनी आणि पोर्सिलेन या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.

Google Pixel 9a launched in India

Google Pixel 9a चे फीचर्स आणि स्पेक्स

Google Pixel 9a फोनमध्ये 6.3-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये Google Tensor G4 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, यासह टायटन M2 सुरक्षा चिप देखील उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB आणि 256GB स्टोरेजमध्ये दोन पर्याय आहेत.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये, 48MP प्रायमरी कॅमेरा आणि 13MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, फोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची बॅटरी 5100mAh आहे, ज्यामध्ये 23W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo