Google च्या आगामी स्मार्टफोन Google Pixel 9a च्या लाँचची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. गुगल आज आपला स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशा बातम्या जिकडे तिकडे येत आहेत. होय, Google Pixel 9a आज 19 मार्च रोजी लाँच केला जाईल, असे बोलले जात आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या लाँचिंगबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नसली तरी, अनेक लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये त्याच्या लाँचिंगची माहिती देण्यात आली आहे.
ताज्या लीकनुसार, हा स्मार्टफोन 26 मार्च रोजी विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो. या फोनची स्पर्धा थेट Apple च्या नव्या iPhone 16e सोबत होणार आहे. लाँच तारखेसोबतच या फोनची संभाव्य किंमत आणि फीचर्स देखील लीक झाली आहेत.
Also Read: Realme P3 Ultra आणि Realme P3 5G भारतात लाँच! जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि सर्व स्पेक्स
लीक अहवालानुसार, आगामी Google Pixel 9a ला कंपनी $499 म्हणजेच सुमारे 43,100 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करू शकते. महत्वाचे म्हणजे हा फोन अमेरिकन बाजारपेठेपेक्षा जास्त किमतीत भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार, या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत भारतात 52,999 रुपये असू शकते. 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 64,000 रुपये असू शकते.
Google Pixel 9a स्मार्टफोनची डिझाईन Pixel 9 सिरीजमधील इतर फोनसारखीच असेल. या फोनमध्ये 6.3 इंच लांबीचा डिस्प्ले असू शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच, स्क्रीन प्रोटेक्शनसाठी गोरिल्ला ग्लास दिला जाऊ शकतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, Google Tensor G4 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तर, लीकनुसार, हा स्मार्टफोन 48MP चा मुख्य लेन्स आणि 13MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येईल. यात 5100mAh बॅटरी दिली जाऊ शकते.