नुकतेच पार पडलेल्या ‘मेड बाय गुगल इव्हेंट’ मध्ये Google Pixel 9 सिरीज लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या सिरीजअंतर्गत यामध्ये Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि Pixel 9 Pro Fold स्मार्टफोन्स सादर केले आहेत. ही नवी स्मार्टफोन सिरीज आजपासून भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाली आहे. प्री-ऑर्डर केल्यावर ग्राहकांना अनेक उत्तम ऑफर्स मिळतील. खरं तर, हे फोन प्री-ऑर्डर केल्यास तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. जाणून घेऊयात ऑफर्स-
लेटेस्ट Google Pixel 9 Series ची प्री-ऑर्डर आज दुपारी 12 वाजतापासून भारतात सुरू झाली आहे. लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart द्वारे हे स्मार्टफोन प्री-ऑर्डर केले जाऊ शकतात. प्री-ऑर्डर केल्यावर, तुम्हाला ICICI बँक कार्डवर तब्बल 10,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक दिला जाईल.
एवढेच नाही तर, ही ऑफर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांसाठी उपलब्ध आहे. त्याबरोरबच, विशेष म्हणजे प्री-ऑर्डरवर Pixel Buds Pro मर्यादित काळासाठी केवळ 7,999 रुपयांना खरेदी करता येतील. या स्मार्टफोन्सची विक्री 22 ऑगस्ट 2024 पासून सुरू होईल.
या ऑफर्ससह तुम्ही 66,999 रुपयांमध्ये Google Pixel 9 प्री-ऑर्डर करू शकता. त्याबरोबरच, लक्षात घ्या की, Google Pixel 9 ची किंमत 79,999 रुपये आहे. तर, Pixel 9 Pro 1,09,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. या सिरीजमधील XL वेरिएंटची किंमत 1,24,999 रुपये आहे.
Google Pixel 9 सिरीजअंतर्गत लाँच झालेले सर्व स्मार्टफोन Google च्या नवीन Tensor G4 चिपसेटसह आणले गेले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, सिरीजमधील Pro आणि XL व्हेरिएंटमध्ये बॅटरी आणि डिस्प्लेच्या आकारात फरक आहे. तर, कॅमेरा आणि इतर फीचर्स एकसारखे आहेत. हे स्मार्टफोन Android 14 आधारित OS वर चालतात. विशेष म्हणजे कंपनीने हे फोन अनेक AI फीचर्ससह सादर केले आहेत. Google Pixel 9 सिरीजबद्दल सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.