प्रतीक्षा संपली! अखेर बहुप्रतीक्षित Google Pixel 9 सिरीज भारतात लाँच, अनेक Powerful फीचर्ससह नवे फोन दाखल

Updated on 14-Aug-2024
HIGHLIGHTS

'Made By Google' इव्हेंटमध्ये नवीन Google Pixel 9 सिरीज लाँच

सीरीज अंतर्गत कंपनीने Pixel 9, Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL असे तीन स्मार्टफोन करण्यात आले.

तिन्ही फोन भारतात 14 ऑगस्ट 2024 पासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होतील.

Google च्या आगामी नंबर स्मार्टफोन सिरीजची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून टेक विश्वात सुरु होती. नुकतेच पार पडलेल्या Google च्या वर्षातील सर्वात मोठ्या ‘Made By Google’ इव्हेंटमध्ये नवीन स्मार्टफोन सिरीज आणि नवीन उपकरणे सादर करण्यात आली आहेत. होय, अखेर Google Pixel 9 Series भारतात लाँच झाली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने Pixel 9, Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, XL व्हेरिएंट हा या वर्षी लाँच होणारा पहिला Pixel हँडसेट आहे. तर, या तीन फोन्सबरोबरच, कंपनीने या सीरिजमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन Pixel 9 Fold देखील लाँच केला आहे. चला तर मग जाणून घेउयात Google Pixel 9 सिरीजची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: OnePlus च्या लेटेस्ट स्मार्टफोन्सवर मिळतोय भारी Discount, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

Google Pixel 9 सिरीजची किंमत

Google ने Google Pixel 9 ची किंमत 79,999 रुपये निश्चित केली आहे. तर, Google Pixel 9 Pro XL 1,24,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सादर करण्यात आला आहे. त्याबरोबरच, Google Pixel 9 Pro ची किंमत 1,09,999 रुपये आहे. हे तिन्ही फोन भारतात 14 ऑगस्ट 2024 पासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होतील. हे फोन Flipkart वरून खरेदी करता येतील.

Google Pixel 9 चे फीचर्स आणि स्पेक्स

Google Pixel 9 फोनमध्ये 6.3 इंच लांबीचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा डिव्हाइस Google Tensor G4 चिपसेटसह येतो. त्याबरोबरच, हा फोन Android 14 सह कार्य करेल. फोनमध्ये 12GB रॅमसह 256GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, यात 50MP मुख्य आणि 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 10.5MP ड्युअल PD कॅमेरा आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 4700mAh बॅटरी आहे, जी यात 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यासह फोन 30 मिनिटांत 55% चार्ज होईल, ज्यामध्ये USB टाइप-C चार्जिंग पोर्ट उपलब्ध आहे.

Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL चे फीचर्स

Google Pixel 9 Pro मध्ये 6.3 इंच लांबीचा LTPO डिस्प्ले आहे. तर, Pixel 9 Pro XL मध्ये 6.8 इंच लांबीचा LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसह उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोन्समध्ये Google Tensor G4 चिपसेट देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Google Pixel 9 Pro फोनमध्ये 4700mAh बॅटरी आहे. तर, Pixel 9 Pro XL फोनमध्ये 5,060mAh बॅटरी आहे. लक्षात घ्या की, हे दोन्ही स्मार्टफोन्स 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतात.

कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 48MP टेलिफोटो लेन्स आणि 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 42MP ड्युअल PD कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही फोन Android 14 वर कार्य करतात. Google Pixel 9 Pro फोन 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो. तर, हँडसेट 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह येतो.

आम्ही तुम्हाला सांगतो की, वरील सर्व फोन Apple iPhone प्रमाणे SOS सॅटेलाइट फीचरसह आणले गेले आहेत. याशिवाय, फोन स्क्रीनशॉट ॲप, पिक्सेल स्टुडिओ आणि नव्या वेदर ॲपसारख्या जबरदस्त फीचर्ससह देखील सादर केले गेले आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :