Google च्या आगामी लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून टेक विश्वात सुरु होती. अखेर आता Google Pixel 9 सिरीजची भारतीय लाँच डेट कन्फर्म करण्यात आली आहे. Google Pixel 9, Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL व्यतिरिक्त, या सिरीजमध्ये Google चा पहिला फोल्डेबल फोन देखील समाविष्ट असेल. Google Pixel 9 सिरीजची सेल प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart द्वारे होईल. आगामी सिरीजची डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील Flipkart वर लाइव्ह झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Google Pixel 9 सिरीजचे लॉन्चिंग डिटेल्स-
हे सुद्धा वाचा: सरकारचा मोठा निर्णय! नवी सिस्टम घेणार FASTag ची जागा, आता लांबलचक रांगांपासून होईल सुटका
वर सांगितल्याप्रमाणे, ही कंपनीची बहुप्रतिक्षित सिरीज आहे, जी बऱ्याच काळापासून लीकचा भाग होती. आता अखेर कंपनीने Google Pixel 9 सिरीजच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. Flipkart मायक्रोसाइटद्वारे Google Pixel 9 सीरीजच्या लाँच तारखेची पुष्टी करण्यात आली आहे. ही सिरीज 14 ऑगस्टला भारतात लाँच होणार आहे. या व्यतिरिक्त, Google Pixel 9 सीरीज तसेच Google फोल्डेबल फोनची पहिली झलक देखील Flipkart लिस्टिंगवर दिसली आहे.
Google Pixel 9 सिरीज गेल्या अनेक दिवसांपासून लीकचा भाग आहे. लीकवर विश्वास ठेवला तर, या सिरीजमध्ये Google Pixel 9, Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL फोन समाविष्ट असतील. लीक फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Google Pixel 9 आणि 9 Pro फोनमध्ये 6.3 इंच लांबीचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तर, Pixel 9 Pro XL मॉडेल मोठ्या 6.8 इंच लांबीच्या डिस्प्लेसह दाखल होईल.
याव्यतिरिक्त, Pixel 9 Pro Fold बद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.3 इंच लांबीचा कव्हर आणि 8 इंच प्राथमिक कॅमेरा असू शकतो. हे चारही फोन Tensor G4 चिपसेटने सुसज्ज असतील, अशी अपेक्षा आहे. तर, Pixel 9 मध्ये 12GB रॅम आणि Pixel 9 Pro, Pro XL आणि Pro Fold 16GB पर्यंत RAM सह ऑफर केले जाऊ शकतात.
फोटोग्राफीसाठी, Pixel 9 ला 50MP प्राथमिक, 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 10.5MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. Pixel 7 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48MP प्राथमिक कॅमेरा, 10.5MP अल्ट्रा-वाइड सेन्सर, 10.8MP टेलिफोटो सेन्सर आणि 10MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. मात्र, वरील सर्व स्मार्टफोन्स लाँच झाल्यानंतरच फोनचे योग्य तपशील पुढे येतील.