Google Pixel 9 Pro ची प्री-ऑर्डर भारतात आजपासून होणार सुरू, जाणून घ्या ऑफर्स आणि सर्व डिटेल्स

Updated on 17-Oct-2024
HIGHLIGHTS

Google च्या नवीनतम Google Pixel 9 Pro साठी प्री-ऑर्डर आजपासून सुरु होणार

Google Pixel 9 Pro 5G फोन Flipkart द्वारे प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो.

Google Pixel 9 Pro 5G स्मार्टफोन फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Google च्या नवीनतम Google Pixel 9 Pro साठी प्री-ऑर्डर आज म्हणजेच 17 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहेत. Google Pixel 9 Series काही काळापूर्वी भारतात सादर करण्यात आली होती. या सिरीजअंतर्गत Google Pixel 9, Google Pixel 9 Pro, Google pixel 9 Pro XL, Pixel Pro Fold असे चार मॉडेल समाविष्ट आहेत. चला तर मग जास्त वेळ न घालवता Google Pixel 9 Pro चे प्री-ऑर्डर डिटेल्स सविस्तरपणे जाणून घेऊयात-

Also Read: IMC 2024: 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत Redmi A4 5G फोन भारतात लाँच, काय मिळेल विशेष?

Google Pixel 9 Pro 5G चे प्री-ऑर्डर डिटेल्स

Google Pixel 9 Pro 5G स्मार्टफोन फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत 1,09,999 रुपये आहे. वर सांगितल्याप्रमाणे, Google Pixel 9 Pro साठी प्री-ऑर्डर आज म्हणजेच 17 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन Flipkart द्वारे प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो. Google Pixel 9 Pro 5G फोन Hazel, Porcelain, Rose Quartz आणि Obsidian colourways कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. प्री-ऑर्डरसाठी येथे क्लिक करा.

Google Pixel 9 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

Google Pixel 9 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच लांबीचा SuperActua (LTPO) OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम कार्यक्षमतेसाठी, गुगलच्या या फोनमध्ये इन-हाउस चिपसेट Tensor G4 उपलब्ध आहे. हा फोन Android 14 वर कार्य करेल. Google ने पिक्सेल उपकरणांसाठी Android 15 रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, पाणी आणि धुळीपासून प्रोटेक्शनसाठी फोनला IP68 रेटिंग मिळाले आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP मेन, 48MP अल्ट्रा वाइड अँगल, 48MP पेरिस्कोप लेन्स आणि 42MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवर बॅकअपसाठी, हा स्मार्टफोन 4700mAh बॅटरीसह येतो, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये USB टाइप-C पोर्ट, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.3, NFC, गुगल कास्ट इत्यादी फीचर्स आहेत.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलियेट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :