Google ने अलीकडेच Google Pixel 9 सिरीज टेक विश्वात लाँच केली होती. आता Google Pixel 9 Pro ची पहिली सेल भारतात 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ऑगस्टमध्ये Pixel 9 सिरीज लाँच करताना या डिव्हाइसची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, आता Google Pixel 9 उपलब्धतेची माहिती देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart आणि इतर रिटेल आउटलेटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Also Read: लेटेस्ट OPPO F27 5G फोनवर आश्चर्यकारक डील उपलब्ध, Amazon सेलदरम्यान खरेदी करण्याची संधी
नवीनतम Google Pixel 9 Pro ची भारतीय किंमत 1,09,999 रुपये इतकी आहे. या डिव्हाइसची विक्री 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता Flipkart वर सुरू होणार आहे. सध्या Google आणि Flipkart ने Pixel 9 Pro वर बँक डिस्काउंटबद्दल माहिती दिलेली नाही. Google Pixel 9 Pro याआधी सादर केलेल्या Pixel 9 Pro XL प्रमाणे पोर्सिलेन, रोझ क्वार्ट्ज, हेझ आणि ऑब्सिडियन या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
Google Pixel 9 Pro फोनमध्ये 6.3-इंच लांबीचा LTPO AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन असेल. चांगल्या परफॉर्मन्ससाठी डिव्हाइस टायटन एम2 सुरक्षा चिपसह Google Tensor G4 प्रोसेसर देईल. Google Pixel 9 Pro फोन Android 14 सह कार्य करेल, यासह तुम्ही 7 वर्षांचे OS, सुरक्षा आणि फीचर ड्रॉप अपडेट्स मिळतील. त्याबरोबरच, फोनमध्ये अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, IP68 रेटिंग मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी, कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यामध्ये OIS सह 50MP प्रायमरी, 48MP 5x टेलिफोटो कॅमेरा आणि 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा असणार आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 42MP कॅमेरा उपलब्ध असेल. पॉवर बॅकअपसाठी, डिव्हाइसमध्ये 27W वायर्ड फास्ट चार्जिंग, 21W वायरलेस चार्जिंगसह 4700mAh बॅटरी मिळेल. फोनमध्ये USB टाइप-C ऑडिओ, स्टिरिओ स्पीकर, 5G, 4G VoLTE, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.3 सारखी फीचर्स मिळतील.