जगातील सर्वात स्लिम फोल्डेबल फोन Google Pixel 9 Pro Fold अखेर लाँच, सर्वोत्तम AI तंत्रज्ञानासह सज्ज
नवा फोल्डेबल फोन Google Pixel 9 Pro Fold अधिकृतपणे लाँच
या फोनमध्ये Google ने सर्वोत्तम AI तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
विशेष म्हणजे या फोनच्या रियर कॅमेऱ्याने देखील सेल्फी घेता येतात.
Made by Google इव्हेंटमध्ये ब्रॅंडने आपली नवीन स्मार्टफोन सिरीज Pixel 9 सिरीज भारतात लाँच केली. या सिरीज अंतर्गत आणखी एक Google Pixel 9 Pro Fold अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. हा जगातील सर्वात स्लिम फोल्डेबल फोन आहे, असे सांगितले जात आहे. या फोनमध्ये Google ने सर्वोत्तम AI तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा फोल्डेबल फोन अनेक उत्कृष्ट फीचर्ससह येतो आणि AI असिस्टंटमध्ये अंतर्भूत आहे. जाणून घेउयात Google Pixel 9 Pro Fold ची किंमत आणि फीचर्स-
Google Pixel 9 Pro Fold किंमत
Meet Google #Pixel9 Pro Fold—an epic display of Google AI.
— Made by Google (@madebygoogle) August 13, 2024
⚡ Multitask in Split Screen and supercharge your ideas with Gemini*
🍂 Reimagine photos with Magic Editor*
🍿 Enjoy the largest display on a phone*
Unfold more magic at the Google Store: https://t.co/z7Lfn7fFsa pic.twitter.com/aMblrcweNy
Google Pixel 9 Pro Fold हा स्मार्टफोन भारतात 1,72,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हे ऑब्सिडियन आणि पोर्सिलेन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी केले जाऊ शकते. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart व्यतिरिक्त क्रोमा आणि रिलायन्स डिजिटलवर सुद्धा खरेदीसाठी उपलब्ध असेल. मात्र, या फोनच्या विक्रीची तारीख अद्याप पडद्याआडच आहे.
Google Pixel 9 Pro Fold चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 9 Pro Fold एका नव्या मजबूत डिझाइनसह येतो. फोनला पाण्याच्या प्रतिकारासाठी IPX8 असे रेटिंग देण्यात आले आहे. प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 ने आऊटर डिस्प्ले संरक्षित केला आहे. स्मार्टफोनची इनर स्क्रीन 8 इंच लांबीची आहे. तर, त्याची आऊटर स्क्रीन 6.3 इंच लांबीची आहे. दोन्ही स्क्रीन 60-120Hz आणि HDR पर्यंत रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह उपलब्ध आहेत.
उत्तम परफॉर्मन्ससाठी Pixel 9 Pro Fold मध्ये Google चा सर्वात वेगवान आणि पॉवरफुल Tensor G4 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो 16GB RAM आणि 256GB/512GB स्टोरेजसह जोडलेला आहे. त्याबरोबरच, हा डिवाइस Android 14 सह लॉन्च करण्यात आला आहे. कंपनी 7 वर्षांची OS, सुरक्षा आणि पिक्सेल ड्रॉप अपडेट्स देण्याचे आश्वासन देत आहे. पॉवरसाठी, यात 4650mAh बॅटरी आहे, जी 45W चार्जिंगला समर्थन देते. सिंगल चार्जवर ही बॅटरी 24 तासांपेक्षा जास्त काळ टिकण्याची क्षमत ठेवते.
फोटोग्राफीसाठी, या स्मार्टफोनमध्ये ऍडव्हान्स ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टीम आहे. ज्यामध्ये 48MP क्वाड PD वाइड, 10.5MP ड्युअल PD अल्ट्रावाइड आणि 10.8MP टेलीफोटो लेन्स आहे. ज्याचा वापर 5x ऑप्टिकल झूम आणि 20x सुपर रेझ्युम झूमसाठी केला जाऊ शकतो.
यापैकी, वाइड आणि टेलिफोटो सेन्सरला OIS आणि EIS सह सपोर्ट करण्यात आला आहे. याशिवाय, यात 10MP फ्रंट कॅमेरा आहे आणि यात 10MP आतील कॅमेरा देखील आहे. विशेष म्हणजे या फोनच्या रियर कॅमेऱ्याने देखील सेल्फी घेता येतात आणि तुम्ही हात न वापरता फोटो काढण्यासाठी टेबलटॉप मोड वापरू शकता.
Gemini AI
Pixel 9 Pro Fold मध्ये बिल्ट-इन AI असिस्टंट Gemini देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही पॉवर बटण दाबून ठेवून स्टोरी, ब्लॉग, इव्हेंट प्लॅन्स इ. करू शकता. तुम्ही Pixel 9 Pro Fold च्या स्प्लिट स्क्रीनवर मल्टीटास्क करण्यासाठी Gemini वापरू शकता. Gemini शी चॅट करून तुम्ही तुमच्या स्क्रीनवरील वस्तू किंवा फोटोंबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. तुम्हाला एक वर्षाच्या Google One AI प्रीमियम प्लॅन्ससह अतिरिक्त AI क्षमता देखील मिळतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile