Google चा आगामी स्मार्टफोन Google Pixel 9 Pro Fold ची भारतीय लाँच डेट जाहीर झाली आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने Google Pixel 9 Pro ची देखील लाँच डेट जाहीर केली आहे. 13 ऑगस्ट रोजी ब्रँडने आयोजित केलेल्या वर्षातील मोठ्या हार्डवेअर इव्हेंटमध्ये ते जागतिक स्तरावर प्रवेश करतील. त्याचबरोबर, दुसऱ्या दिवशी 14 ऑगस्ट रोजी हे स्मार्टफोन भारतात सादर होणार आहेत, असे सांगितले जात आहे.
यावरून समजलेच असेल की, या वर्षी Google भारतीय बाजारपेठेत त्याच्या पुढच्या पिढीतील पिक्सेल स्मार्टफोन सीरिजसह फोल्डेबल स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे. हे फोल्डेबल फक्त Google Pixel 9 Series अंतर्गत आणले जात आहे. कंपनी Pixel 9 सीरीज अंतर्गत आपला दुसरा फोल्डेबल फोन आणत आहे. जाणून घ्या सविस्तर-
Also Read: बहुप्रतीक्षित Nothing Phone (2a) Plus ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! नव्या फोनचे टीजर जाहीर
Google India ने आपल्या अधिकृत X म्हणजेच (Twitter) खात्यावरून ट्विट करून Pixel 9 Pro Fold स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. ट्विटनुसार, हा स्मार्टफोन 14 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय बाजारात लाँच केला जाईल. या ट्विटसोबत एक पोस्टरही शेअर केले गेले आहे.
या पोस्टमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन दिसत आहे. तुम्ही पोस्टमध्ये बघू शकता की, स्मार्टफोन ग्रे कलर ऑप्शन्स दिसत आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि फ्लॅश त्याच्या मागील बाजूस उपलब्ध आहे. तर, सेल्फीसाठी मध्यभागी पंच होल कटआउट देण्यात आला आहे. त्याबरोबरच, Google Pixel 9 Pro Fold च्या मागील बाजूस मध्यभागी Google लोगो आहे.
स्मार्टफोन निर्माता Google कंपनी ऑगस्टमध्ये ‘Made by Google’ इव्हेंट आयोजित करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या इव्हेंटमध्ये आगामी स्मार्टफोन Google Pixel 9 लाँच केला जाईल. याव्यतिरिक्त, Android 15 देखील यात सादर करण्यात येणार आहे.
Google India कंपनीने आपल्या ट्विटर हँडलद्वारे Google Pixel 9 Pro ची तारीख उघड केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बेस मॉडेलसोबत नवीन सीरिजचे प्रो मॉडेल लाँच केले जाईल. हा फोन फोल्डेबल फोनसोबत 14 ऑगस्ट रोजी सादर केला जाईल. Google ऑगस्टमध्ये त्याच्या मेड बाय Google इव्हेंटमध्ये फक्त Pixel 9 आणि Android 15 लाँच करेल, असे सांगितले जात आहे.
फोल्डेबल फोन प्रमाणेच कंपनीने Pro वेरिएंटची झलकही दाखवली आहे. गुगलच्या टीझरमध्ये हा फोन स्पष्टपणे दिसत आहे. आगामी स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यासह फोनचे इतर तपशील अद्याप पुढे आलेले नाहीत. कंपनी भविष्यात त्यांच्याबद्दल इतर माहितीही सामायिक करेल अशी अपेक्षा आहे.