लेटेस्ट Google Pixel 9 Pro Fold 5G ची पहिली Sale आज, मिळेल तब्बल 10,000 रुपयांची सूट

Updated on 04-Sep-2024
HIGHLIGHTS

Google Pixel 9 Pro Fold 5G स्मार्टफोनची पहिली विक्री दुपारी 12 वाजल्यपासून Flipkart वर सुरू होणार

Google Pixel 9 Pro Fold खरेदी केल्यास तब्बल 10,000 रुपयांची सूट मिळणार

Google Pixel 9 Pro Fold 5G मध्ये AI फीचर्सही उपलब्ध आहेत.

Google ने अलीकडेच आपली नवी स्मार्टफोन सिरीज Goole Pixel 9 सिरीज लाँच केली होती. या सिरीजअंतर्गत अनेक स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे Google Pixel 9 Pro Fold 5G होय. त्यानंतर, आज या स्मार्टफोनची पहिली विक्री दुपारी 12 वाजल्यपासून Flipkart वर सुरू होणार आहे. पहिल्या सेलदरम्यान या स्मार्टफोनवर भारी ऑफर्स उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Google Pixel 9 Pro Fold 5G वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स-

Also Read: 50MP कॅमेरासह Samsung Galaxy A06 फोन भारतात लाँच, किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी

Google Pixel 9 Pro Fold 5G ची किंमत आणि ऑफर्स

Google चा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Google Pixel 9 Pro Fold ची किंमत 1,72,999 रुपये आहे. ही किंमत या फोनच्या 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे Pixel 9 Pro Fold खरेदी केल्यास तब्बल 10,000 रुपयांची सूट मिळणार आहे. एवढेच नाही तर, फोल्डेबल फोनवर 5% कॅशबॅक आणि 8,471 रुपयांचे EMI ऑफर केले जात आहे. Buy From Here

Google Pixel 9 Pro Fold 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 9 Pro Fold मधील मुख्य डिस्प्ले 8 इंच लांबीचा आहे. या फोनमध्ये HDR चा सपोर्ट देखील मिळाला आहे. या फोनची फ्रंट स्क्रीन 6.3 इंच लांबीची आहे. या दोन्ही डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, कंपनीने Google Pixel 9 Pro Fold 5G मध्ये Tensor G4 चिप दिली आहे. तसेच, हँडसेटमध्ये 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे.

Google Pixel 9 Pro Fold display

फोटोग्राफीसाठी, Google Pixel 9 Pro Fold मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP प्राथमिक, 10.5MP अल्ट्रा वाइड आणि 10.8MP टेलिफोटो सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी फोनच्या अंतर्गत आणि मुख्य डिस्प्लेमध्ये 10MP कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4650mAh बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये AI फीचर्सही उपलब्ध आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, गुगलने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये Wi-Fi, GPS, Bluetooth, 5G, 4G आणि USB Type-C पोर्ट दिले आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :