लेटेस्ट Google Pixel 9 सिरीजची सेल सुरु, जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील 

 लेटेस्ट Google Pixel 9 सिरीजची सेल सुरु, जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील 
HIGHLIGHTS

Google ने अलीकडेच Google Pixel 9 सिरीज लाँच केली.

आज 22 ऑगस्ट 2024 पासून या Google Pixel 9 सिरीजमधील स्मार्टफोनची विक्री सुरु

पहिल्या सेलदरम्यान फोनवर मिळतोय तब्बल 10 हजार रुपयांचा डिस्काउंट

Google ने या महिन्याच्या सुरुवातीला मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये आपली नवीनतम नंबर सिरीज म्हणजेच Google Pixel 9 सिरीज लाँच केली होती. तेव्हापासून नव्या सिरीजमधील स्मार्टफोन देशात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर, आता नवीनतम Pixel 9 आणि Pixel 9 Pro XL स्मार्टफोन आता भारतीय बाजरात खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. हे स्मार्टफोन्स ग्राहक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart द्वारे किंवा क्रोमा आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून ऑफलाइन खरेदी करण्यास सक्षम असतील.

Pixel 9 आणि Pixel 9 Pro XL ची किंमत आणि ऑफर्स

Google Pixel 9 स्मार्टफोनच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 79,999 रुपये इतकी आहे. हा फोन विंटरग्रीन, पेनी, ऑब्सिडियन, पोर्सिलेन या कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे. तर, Pixel 9 Pro XL स्मार्टफोनच्या 16GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,24,999 रुपये इतकी आहे. तर, 16GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,39,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन हेझेल, ऑब्सिडियन, पोर्सिलेन, रोझ क्वार्ट्ज या कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे. येथून खरेदी करा

Google Pixel 9 series

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart वर Pixel 9 वर ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 4,000 रुपये आणि Pixel 9 Pro XL वर 10,000 रुपयांची झटपट सूट दिली जाते. Flipkart प्री-ऑर्डरसह 7,999 रुपयांच्या सवलतीच्या किमतीचे Pixel Buds Pro वायरलेस इयरबड्स ऑफर करत आहे. याशिवाय, यात 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI पर्याय उपलब्ध आहेत. Buy From Here

Google Pixel 9

Google Pixel 9 मध्ये 60Hz ते 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 6.3-इंच लांबीचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाइस समोर आणि मागे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 द्वारे प्रोटेक्शन उपलब्ध आहे. Google Tensor G4 प्रोसेसरद्वारे समर्थित, Pixel 9 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह येतो. यात ड्युअल रीअर कॅमेरा सिस्टम आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि मॅक्रो फोकससह 48MP अल्ट्रावाइड कॅमेरा उपलब्ध आहे. तर, फ्रंटमध्ये 10.5MP ऑटोफोकस सेन्सर मिळेल. त्याबरोबरच, फोनमध्ये 4,700 mAh बॅटरी समाविष्ट आहे, जी वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

Google-Pixel-9-Pro-and-Google-Pixel-9-Pro-XL

Google Pixel 9 Pro XL

Pixel 9 Pro XL हे Pixel 9 सिरीजमधील सर्वात मोठे मॉडेल आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रीफ्रेश रेटसह 6.8-इंच लांबीचा सुपर ॲक्टुआ LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस 2 द्वारे संरक्षित आहे. Pixel 9 Pro XL मध्ये Pixel 9 Pro सारखीच ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणारी मोठी 5,060 mAh बॅटरी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo