Google ने नुकतेच Google Pixel 9a स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा या सिरीजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Google Pixel 8a स्मार्टफोनचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. दरम्यान, नवीन पिक्सेल फोन लाँच होताच सध्याच्या Google Pixel 8a स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Google Pixel 8a स्मार्टफोनची नवी किंमत आणि फीचर्स-
Also Read: AI फीचर्ससह Vivo चा जबरदस्त फोन गुपचूप भारतात लाँच, किंमत 8000 रुपयांपेक्षा कमी
Google Pixel 9a फोन कंपनीने 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, आता जुन्या Google Pixel 8a फोनची किंमत कमी झाली आहे. लाँचच्या वेळी, कंपनीने Google Pixel 8a फोन 52,999 रुपयांच्या किमतीत लाँच केला होता. आता तुम्ही ते केवळ 37,999 रुपये सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. तर, फोनचा 256GB स्टोरेज व्हेरिएंट 59,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र, आता हा फोन 44,999 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल.
Google Pixel 8A फोनमध्ये 6.1-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच-होल कटआउट आहे. याव्यतिरिक्त, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये Google Tensor G3 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झल्यास, हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी फोनला IP68 रेटिंग मिळते.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. त्याबरोबरच, यात 13MP चा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. सेल्फीच्या शौकीन लोकांसाठी हा कॅमेरा योग्य ठरेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4404mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यासोबत तुम्हाला 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.