प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Google चा लेटेस्ट Google Pixel 8a भारतात नव्या फीचर्ससह भारतात लाँच झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा मिड रेंजमध्ये येणारा प्रीमियम स्मार्टफोन आहे. नव्या Google Pixel 8a ची डिझाईन आधीच्या मॉडेलसारखीच आहे. नव्या फोनमध्ये तुम्हाला AI फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात नव्या Google Pixel 8A ची किंमत आणि नव्या फीचर्सद्वारे काय मिळेल विशेष?
हे सुद्धा वाचा: Motorola Edge 50 Fusion लवकरच भारतात होणार लाँच, टीझर Video मध्ये बघा पहिली झलक। Tech News
Google Pixel 8a दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये म्हणजेच 8GB + 128GB आणि 8GB + 256GB सह उपलब्ध आहे. या दोन्ही स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 52,999 रुपये आणि 59,999 रुपये इतकी आहे. एवढेच नाही तर, यावर ऑफर्सदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या फोनवर 4,000 रुपयांची सूट आणि 9,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे. याव्यतिरिक्त, फोनवर नो-कॉस्ट EMI चा पर्याय देखील मिळेल.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Google Pixel 8a ची विक्री 14 मे पासून ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सुरू होईल.
Google Pixel 8a मध्ये AI आधारित मॅजिक एडिटर देण्यात आला आहे. या नव्या फिचरद्वारे यूजर्स कोणत्याही फोटोमधून नको असलेल्या वस्तू काढून टाकू शकतात. व्हिडिओमधून अनावश्यक आवाज काढण्यासाठी यात ऑडिओ मॅजिक इरेजर देखील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये सर्कल टू सर्चची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे, जेणेकरून तुम्ही कोणतीही गोष्ट अगदी सहज सर्च करू शकता.
Google Pixel 8a स्मार्टफोनमध्ये 6.1 इंच लांबीचा FHD+OLED HDR डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी त्यावर कॉर्निंग गोरिला ग्लास 3 देखील आहे. अखंड आणि सुरळीत कामकाजासाठी, Google Pixel मालिकेतील नवीन स्मार्टफोनमध्ये Tensor G3 सोबत Titan M2 सिक्योरिटी चिप देण्यात आली आहे. नवीन पिक्सेल स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.
फोटोग्राफीसाठी Google Pixel 8A मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 64MP प्रायमरी आणि 13MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तर, सेल्फीसाठी 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याद्वारे 4K व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल. यामध्ये अगदी मजबूत 4492mAh बॅटरी आहे, जी 18W वायर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. याव्यतिरिक्त, फोनमध्ये वायरलेस फास्ट चार्जिंगसाठी देखील समर्थन मिळणार आहे.