बहुप्रतीक्षित Google Pixel 8a ग्लोबलसोबत भारतात देखील होणार लाँच, बॅटरी BIS वर सूचीबद्ध। Tech News
Google Pixel 8a फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे.
हा फोन जागतिक बाजारपेठेसह भारतात देखील लाँच केला जाणार आहे.
Google I/O 2024 इव्हेंट कॅलिफोर्नियामध्ये 14 मे पासून सुरू होणार आहे.
अलीकडेच Google I/O इव्हेंट दरम्यान कंपनी Pixel 8a चे अनावरण करू शकते, अशा बातम्या सुरु होत्या. आज या फोनबाबत एक मोठी लीक समोर आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Google Pixel 8a ची बॅटरी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजेच BIS वर सूचीबद्ध आहे. त्यामुळे हा फोन जागतिक स्तरावर तसेच भारतातही लाँच केला जाऊ शकतो. जाणून घेऊयात सविस्तर माहिती-
हे सुद्धा वाचा: Amazon iQOO Quest Days: प्रसिद्ध कंपनीच्या फोनवर मिळतोय प्रचंड Discount, बघा Best ऑफर्स। Tech News
Google Pixel 8a BIS लिस्टिंग
Google Pixel 8A ची ही BIS सूची आजची गुरुवार म्हणजेच 21 मार्चची आहे.मॉडेल क्रमांक GVYZ7 सह मोबाईल फोन या BIS वर आला आहे. या सूचीद्वारे Google Pixel 8a फोनच्या बॅटरीबद्दल माहिती मिळाली आहे, जी लिथियम बॅटरी असणार आहे. अलीकडेच UL Demko सर्टिफिकेशनवर Pixel 8A ची बॅटरी क्षमता देखील समोर आली होती. त्यानुसार, यामध्ये 4,558mAh रेट केलेली बॅटरी असू शकते. जी लाँच दरम्यान 5,000mAh पर्यंतची बॅटरी असू शकते.
Google Pixel 8aचे अपेक्षित भारतीय लाँच
कंपनीने Pixel 8A बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, Google I/O 2024 इव्हेंट 14 मे पासून सुरू होणार आहे. त्यामुळे हा Pixel स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत इव्हेंटदरम्यान घोषित केला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. Google 14 मे रोजी कॅलिफोर्नियामध्ये या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे, ज्याचे थेट प्रक्षेपण भारतात देखील केले जाणार आहे.
Google Pixel 8a चे लीक स्पेसिफिकेशन्स
लीकनुसार, Google Pixel 8A स्मार्टफोन 6.1-इंच लांबीच्या फुल HD+ डिस्प्लेवर लाँच केला जाऊ शकतो. ही स्क्रीन OLED पॅनेलवर बनवली जाईल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध असण्याची शक्यता आहे. फोनच्या प्रोसेसरबद्दल देखील लीक समोर आले आहेत. Pixel 8a मोबाईल फोन गुगलचा स्वतःचा पॉवरफुल चिपसेट Tensor G3 सह बाजारात लाँच केला जाऊ शकतो.
स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB LPDDR5X रॅम आणि 128GB UFS 3.1 स्टोरेज असू शकते. फोटोग्राफीसाठी, Pixel 8a फोन 64MP Sony IMX787 लेन्स आणि 13MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्ससह येऊ शकतो. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP Sony IMX712 लेन्स कॅमेरा उपलब्ध असेल. मात्र, फोनच्या स्पेक्सबद्दल सर्व योग्य माहिती लाँचनंतरच कळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile