50MP कॅमेरासह Google Pixel 8 वर मिळतेय तब्बल 16,000 रुपयांची सूट, बघा Best ऑफर। Tech News

Updated on 19-Dec-2023
HIGHLIGHTS

Google Pixel 8 फोन बंपर डिस्काउंट ऑफर्ससह उपलब्ध

फोनवर बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 16,000 रुपयांची सूट उपलब्ध

स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोन Tensor G3 चिपसेटने सुसज्ज आहे.

Google ने यावर्षी आपली लेटेस्ट आणि लोकप्रिय Google Pixel 8 स्मार्टफोन सिरीज लाँच केली. हा स्मार्टफोन लाँच होताच लोकप्रिय झाला होता. हा स्मार्टफोन हाय-रेंज किंमत श्रेणीमध्ये येतो, त्यामुळे हा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना नक्कीच आपले खिसे तपासून घ्यावे लागतात. अशा परिस्थितीत इच्छुक ग्राहकांसाठी आम्ही खास बातमी आणली आहे. होय, Google Pixel 8 फोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून बंपर डिस्काउंट ऑफर्ससह खरेदी केला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy A25 आणि Galaxy A15 5G च्या भारतीय लाँच डेट Confirm! बजेटमध्ये बसतील का फोन? Tech News

Google Pixel 8

Google Pixel 8 फोनची किंमत आणि ऑफर्स

Google Pixel 8 स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 75,999 रुपये इतकी आहे. वर सांगितल्याप्रमाणे हा स्मार्टफोन सध्या फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Google Pixel 8 वर उपलब्ध असलेल्या सवलतीच्या ऑफरबद्दल बोलायचे तर, फोनवर बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 16,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तर तुम्ही हा फोन 4,223 रुपयांच्या प्रारंभिक EMI सह देखील घरी आणू शकता. येथून खरेदी करा

Google Pixel 8

Google च्या Google Pixel 8 स्मार्टफोनमध्ये 6.2 इंच लांबीचा फुल HD + डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. त्याबोरबरच, हा स्मार्टफोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Tensor G3 चिपसेटने सुसज्ज आहे. स्मार्टफोन पाण्याच्या संरक्षणासाठी IP68 रेटिंगसह येतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 8GB रॅम, 128GB आणि 256GB स्टोरेज मॉडेल्ससह उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यासोबत 12MP सेकंडरी कॅमेरा समाविष्ट केला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4575mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :