लेटेस्ट Google Pixel 8 वर मिळतोय तब्बल 16 हजार रुपयांचा Discount, मिळेल फोटोग्राफीचा उत्तम अनुभव। Tech News

Updated on 05-Dec-2023
HIGHLIGHTS

Google Pixel 8 वर प्रचंड प्रमाणात डिस्काउंट सादर करण्यात आला आहे.

स्मार्टफोनमध्ये Tensor G3 प्रोसेसर आहे आणि अनेक AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

ही सिरीज फोटोग्राफीसाठी लोकप्रिय आहे, यामध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Google ने आपल्या लेटेस्ट म्हणजेच नव्याने लाँच झालेल्या Google Pixel 8 वर प्रचंड प्रमाणात डिस्काउंट सादर केला आहे. होय, प्रसिद्ध इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर ही सवलत देण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ऑफर्स अंतर्गत हा स्मार्टफोन तुम्ही तब्बल 19 हजार रुपयांनी स्वस्तात खरेदी करू शकता. ही सिरीज फोटोग्राफीसाठी लोकप्रिय आहे, यामध्ये 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनवरील उपलब्ध सर्व ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: Jio ने आणला धमाकेदार प्लॅन, Unlimited बेनिफिट्ससह 401 रुपयांमध्ये देतोय तब्बल 1TB डेटा। Tech News

Google pixel

Google Pixel 8 ची किंमत आणि ऑफर्स

Google Pixel 8 हा स्मार्टफोन कंपनीने 75,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्हाला तब्बल 16,000 रुपयांची बँक ऑफर मिळणार आहे. एवढेच नाही तर, तुम्हाला 3,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. यासह, तुम्ही हा फोन तब्बल 19 हजार रुपयांनी स्वस्तात खरेदी करू शकता.

हा फोन Hazel, Obsidian आणि Rose या कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच, या फोनचा टॉप व्हेरिएंट 82,999 रुपयांना मिळेल. येथून खरेदी करा

Image: Google Pixel 8

Google Pixel 8

या Google स्मार्टफोनमध्ये 6.2 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिझाइनसह डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि हाय रिफ्रेश रेट फिचर देखील आहे. या स्मार्टफोनमध्ये Tensor G3 प्रोसेसर आहे आणि अनेक AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. स्मार्टफोन 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB या दोन व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल.

या स्मार्टफोनच्या रियरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP मेन कॅमेरा असेल आणि दुसरा 12MP चा कॅमेरा आहे. या कॅमेरासह तुम्ही उत्तम तपशील कॅप्चर करण्यास सक्षम असाल. आकर्षक सेल्फीसाठी Google फोनमध्ये 10.5MP फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,575mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. सिंगल चार्जसह तुम्हाला चार्जिंगची उत्तम सुविधा देखील मिळणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :