Google Pixel 8, Pixel 8 Pro बहुप्रतिक्षित स्मार्टफोन पुढील महिन्यात 4 ऑक्टोबर रोजी लाँच होणार आहेत. गुगलच्या या प्रीमियम स्मार्टफोन सीरिजची किंमत लाँच होण्यापूर्वीच लीक झाली आहे. त्याबरोबरच, फोनचा एक प्रोमो VIDEO देखील शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये फोनच्या कॅमेऱ्याची माहिती देखील लीक झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Google Pixel 8 सिरीजसोबत Google चे स्मार्टवॉच आणि इअरबड देखील लाँच केले जातील.
अलीकडेच Google ने पुष्टी केली आहे की, भारतात पिक्सेल 8 मालिकेची प्री-ऑर्डर 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल. त्याबरोबरच, एका प्रसिद्ध टिपस्टरने X (Twitter) वर या फोनच्या सर्व फीचर्स आणि किंमतीची माहिती शेअर केली आहे. चला तर मग, लीकनुसार आगामी स्मार्टफोनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
लीक झालेल्या अहवालानुसार Google Pixel 8 ची सुरुवातीची किंमत $699 म्हणजेच जवळपास 58,000 रुपये असेल. Pixel 8 Pro ची किंमत $899 म्हणजेच अंदाजे 76,000 रुपये असण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात या दोन्ही फोनची किंमत 55,000 ते 80,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. टिपस्टरचा दावा आहे की, त्याला ही माहिती गुगलच्या विश्वसनीय सोर्सेसकडून मिळाली आहे.
Google Pixel 8 Series च्या कॅमेरा स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर Pixel 8 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा असेल. त्याबरोबर Pixel 8 Pro ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. Pixel 8 मध्ये 50MP मुख्य कॅमेरा असेल. याशिवाय फोनमध्ये 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. Pixel 8 Pro मध्ये 50MP मेन कॅमेरा, 48MP क्वाड फेज डिव्हिजन कॅमेरा आणि 48MP टेलिफोटो कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो.
या दोन्ही फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.5MP कॅमेरा असेल. या दोन्ही फोनचे कॅमेरे नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 15 सीरीजला जबरदस्त स्पर्धा देतील, असे म्हटले जात आहे.
Google Pixel 8 मध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.1-इंच लांबीचा डिस्प्ले मिळेल. तर, Pixel 8 Pro मध्ये 120Hz अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा डिस्प्ले असेल. हे दोन्ही उपकरण Google Tensor 3 प्रोसेसरवर काम करतील आणि Android 14 ऑपरेटिंग सिस्टमसह प्रदान केले जाऊ शकतात. काही हार्डवेअर फिचर वगळता, दोन्ही फोनमध्ये फारसा फरक नाही. या दोन्ही फोनची फीचर्स जवळपास समान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.