digit zero1 awards

Google Pixel 8 Pre-Order: ‘या’ दिवशीपासून सुरु होणार आगामी सिरीजची प्री-बुकिंग, iPhone 15ला मिळेल स्पर्धा?

Google Pixel 8 Pre-Order: ‘या’ दिवशीपासून सुरु होणार आगामी सिरीजची प्री-बुकिंग, iPhone 15ला मिळेल स्पर्धा?
HIGHLIGHTS

Pixel 8 आणि Pixel 8 Pro स्मार्टफोन 5 ऑक्टोबर रोजी फ्लिपकार्टवर प्री-ऑर्डरसाठी लाँच होणार आहेत.

ही सिरीज 4 ऑक्टोबर 2023 रोजी मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये सादर केली जाईल.

गुगल इंडियाने अशी घोषणा केली आहे की, पिक्सेल 8 सिरीज Flipkart वर विकली जाणार आहे.

Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro च्या लाँचची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. कंपनीने आगामी सिरीजच्या लाँचची पुष्टी केली आहे. ही सिरीज 4 ऑक्टोबर 2023 रोजी मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये सादर केली जाईल. फोन व्यतिरिक्त, कंपनीने टीझर व्हिडिओमध्ये पुष्टी केली आहे की, या इव्हेंटमध्ये स्मार्टफोनसह नवीन स्मार्टवॉच Pixel Watch 2 आणि Pixel Buds Pro देखील लाँच केले जातील. 

त्यानंतर, आता गुगलने बहुप्रतिक्षित सिरीजच्या प्री-ऑर्डरची तारीखही जाहीर केली आहे. याशिवाय, सीरीजचे फोन कोणत्या ई-कॉमर्स वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध असतील हे देखील उघड करण्यात आले आहे.

 

 

Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro प्री-ऑर्डर तपशील 

कंपनीने आपल्या अधिकृत X (Twitter) वरून ट्विट करून ही माहिती दिली आहे की, Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro स्मार्टफोनसाठी प्री-ऑर्डर लाँच झाल्यानंतर लगेचच म्हणजेच 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होतील.  याव्यतिरिक्त, कंपनीने असेही म्हटले आहे की, लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkartवर प्री-ऑर्डरसाठी फोन उपलब्ध केले जातील.

 

 

स्मार्टफोनसोबतच आगामी गुगल पिक्सेल वॉच आणि इअरबड्स वरील ट्विटमध्ये दाखवण्यात आले आहेत. 

Google Pixel 8 Pro चे लीक तपशील 

जर आपण Google Pixel 8 Pro च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोललो तर त्याचे स्पेक्स लीक झाले आहेत. लीकनुसार, Pixel 8 Pro ला 6.7-इंच लांबीचा QHD LTPO OLED डिस्प्ले मिळणार आहे, तो 120Hz रिफ्रेश रेटवर येणार आहे. याशिवाय, फोनमध्ये Google Tensor G3 चिपसेट असणार आहे. फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असेल. हा फोन Android 14 वर लॉन्च होणार आहे, Google Pixel 8 देखील या OS वर लॉन्च केला जाईल. फोनमध्ये 4950mAh बॅटरी दिसणार आहे, जी 27W फास्ट चार्जिंगसह येईल.

Google Pixel 8 Pro कॅमेरा बद्दल बोलायचे तर, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP OIS प्राथमिक कॅमेरा मिळू शकतो, याशिवाय फोनमध्ये 64MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 48MP टेलिफोटो लेन्स असेल. फोनच्या पुढील बाजूस 11MP सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo