digit zero1 awards

Google Pixel 8 Series आज होणार Launch, जाणून घ्या Live इव्हेंट कधी आणि कुठे बघता येईल? Tech News 

Google Pixel 8 Series आज होणार Launch, जाणून घ्या Live इव्हेंट कधी आणि कुठे बघता येईल? Tech News 
HIGHLIGHTS

Made by Google Event 2023 भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.

स्मार्टफोन व्यतिरिक्त, कंपनी Google Pixel Watch 2 आणि Pixel Buds Pro देखील होणार लाँच

कार्यक्रमात केवळ हार्डवेअरच नाही तर सॉफ्टवेअरच्या घोषणाही केल्या जातील.

मागील काही काळापासून टेक विश्वात Google Pixel 8 Seriesची चर्चा सुरु होती. अखेर आज ही बहूप्रतिक्षित सिरीज लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी ‘Made by Google Event 2023’ होस्ट करेल. Google Pixel 8 Series सोबत, कंपनी या इव्हेंटमध्ये अनेक हार्डवेअर प्रोडक्ट्स देखील लाँच करणार आहे.

Made by Google Event 2023

गुगलचा हा वैयक्तिक कार्यक्रम न्यूयॉर्कमध्ये होत आहे. मात्र, त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. Google इव्हेंट 2023 Google च्या अधिकृत YouTube चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. Google इव्हेंट 2023 आज म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. खाली दिलेल्या Video लिंकवर तुम्ही हा इव्हेंट बघू शकता.

कार्यक्रमात केवळ हार्डवेअरच नाही तर सॉफ्टवेअरच्या घोषणाही केल्या जातील. गुगल मॅप्स, सर्च इत्यादी अनेक गुगल सेवांनाही नवीन सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.

Google Pixel 8 Series

या इव्हेंटमध्ये कंपनी Google Pixel 8 Series लाँच करणार आहे. यामध्ये Google Pixel 8 आणि Google Pixel 8 pro चा समावेश आहे. ही मालिका आजपासून भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध होईल. हे ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून विकले जाईल.कंपनीने आपले पेज आधीच साइटवर लाईव्ह केले आहे. अलीकडेच, Pixel 8 Pro चा अनबॉक्सिंग व्हिडिओ देखील लीक झाला आहे, ज्यामध्ये तुम्ही फोन स्पष्टपणे बघू शकता.

इतर आकर्षक प्रोडक्ट्स देखील होणार लाँच

Google Pixel Watch 2
Google Pixel Watch 2

स्मार्टफोन व्यतिरिक्त, कंपनी Google Pixel Watch 2 देखील लाँच करणार आहे. ही वॉच भारतात लाँच होणार असल्याची पुष्टी देखील कंपनीने केली आहे. एवढेच नाही तर कंपनी या इव्हेंटमध्ये नवीन इअरबड्स देखील सादर करू शकते. कंपनी नवीन कलर ऑप्शन्समध्ये Pixel Buds Pro लाँच करू शकते. हार्डवेअरसोबत, कंपनी या इव्हेंटमध्ये स्मार्टफोनसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम (OS) Android 14 लाँच करेल, अशी माहिती मिळाली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo