बहुप्रतीक्षित Google Pixel 8 सिरीज अखेर टेक विश्वात लाँच, तब्बल 8,000 रुपयांच्या Discountसह खरेदी करा। Tech News 

बहुप्रतीक्षित Google Pixel 8 सिरीज अखेर टेक विश्वात लाँच, तब्बल 8,000 रुपयांच्या Discountसह खरेदी करा। Tech News 
HIGHLIGHTS

Google Pixel 8, Pixel 8 Pro 5G जागतिक स्तरावर लाँच

कंपनीने या दोन्ही फोनच्या प्रोसेसर आणि कॅमेरामध्ये मोठे अपग्रेड केले आहेत.

Pixel 8 च्या खरेदीवर 8,000 रुपयांची बँक सूट मिळेल.

Google Pixel 8, Pixel 8 Pro 5G जागतिक स्तरावर लॉन्च केले गेले आहेत. Google चे हे प्रीमियम स्मार्टफोन्स गेल्या वर्षी लॉन्च केलेले Pixel 7 आणि Pixel 7 Pro चे अपग्रेड केलेले मॉडेल आहेत. कंपनीने या दोन्ही फोनच्या प्रोसेसर आणि कॅमेरामध्ये मोठे अपग्रेड केले आहेत. ही दोन्ही Google उपकरणे आतापर्यंत लाँच केलेल्या सर्व Pixel उपकरणांपेक्षा चांगल्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह येतात. चला तर मग बघुयात सविस्तर माहिती.

Google ची ही नवी उपकरणे AI आधारित फीचर्ससह येतात. गुगलने त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्ससोबत अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टमचा समावेश देखील केला आहे. यामध्ये स्पॅम कॉल फिल्टर, नेक्स्ट जनरेशन गुगल व्हॉईस असिस्टंट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनी या दोन्ही उपकरणांसह 7 वर्षांचे OS अपडेट देखील देत आहे. चला तर जाणून घेऊयात नव्या सिरीजची किमंत-

google pixel 8 series

Google Pixel 8 सिरीजची किंमत

Google Pixel 8 ची सुरुवातीची किंमत 75,999 रुपये आहे. तर, Pixel 8 Pro ची किंमत 1,06,999 रुपये आहे. हे दोन्ही फोन आज रात्रीपासून प्री-बुकिंग करता येतील. हे दोन्ही फोन आजपासून म्हणजेच 4 ऑक्टोबरपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध असतील.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Pixel 8 च्या खरेदीवर 8,000 रुपयांची बँक सूट मिळेल. तसेच, Pixel 8 Pro वर 9,000 रुपयांची सूट दिली जात आहे. याव्यतिरिक्त, Pixel 8 वर 3,000 रुपये आणि Pixel 8 Pro वर 4,000 रुपयांची अतिरिक्त एक्स्चेंज ऑफ देखील मिळणार आहे. Pixel 8 स्मार्टफोन Obsidian, Hazel आणि Rose या तीन कलर ऑप्शन्समध्ये येतो. तर, Pixel 8 Pro फोन Obsidian आणि Bay या दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो.

Google Pixel 8 Series चे फीचर्स

डिस्प्ले

Pixel 8 मध्ये 6.2-इंच लांबीचा FHD+ Acuta OLED डिस्प्ले आहे. या फोनचा डिस्प्ले 60Hz – 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर, Pixel 8 Pro मध्ये 6.7-इंच लांबीचा सुपर Acuta FHD+ डिस्प्ले आहे, जो 1 – 120Hz (LTPO) रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

प्रोसेसर

गुगलचे हे दोन्ही स्मार्टफोन Tensor G3 प्रोसेसरवर काम करतात. फोनमध्ये Android 14 ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध आहे, ज्यामध्ये काही AI आधारित फीचर्स उपलब्ध आहेत.

स्टोरेज

Google Pixel 8 मध्ये 8GB RAM मिळेल आणि Pixel 8 Pro मध्ये 12GB RAM आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 128GB आणि 256GB इंटर्नल स्टोरेज सपोर्टसह येतात.

google pixel 8 series

बॅटरी

Pixel 8 मध्ये 4,575mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर, Pixel 8 Pro मध्ये 5,050mAh बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये फास्ट वायर्ड 30 W USB टाइप C आणि वायरलेस चार्जिंग फीचर आहे.

Google Pixel 8 Series कॅमेरा

सिरीजमधील स्टॅंडर्ड मॉडेल म्हणजे Pixel 8 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP मुख्य आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तर, Pixel 8 Pro स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. यात 50MP मेन कॅमेरा आहे. यासह, 48MP क्वाड फेज डिव्हिजन कॅमेरा उपलब्ध असेल. याशिवाय, यात 48MP टेलिफोटो कॅमेरा देखील उपलब्ध आहे. या दोन्ही फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.5MP कॅमेरा असेल. या दोन्ही फोनचे कॅमेरा मॉड्यूल टेम्परेचर सेंसरने सुसज्ज आहे, जे आसपासच्या वातावरणाचे तापमान सांगतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo