लाँचपूर्वीच आगामी Google Pixel 8 Proचा अनबॉक्सिंग Video लीक, बघा किती Attractive आहे लेटेस्ट स्मार्टफोन

लाँचपूर्वीच आगामी Google Pixel 8 Proचा अनबॉक्सिंग Video लीक, बघा किती Attractive आहे लेटेस्ट स्मार्टफोन
HIGHLIGHTS

Google Pixel 8 सिरीज उद्या 'मेड बाय गुगल इव्हेंट' 2023 मध्ये लाँच होईल.

तुम्ही उद्यापासून म्हणजेच ४ ऑक्टोबरपासून फोनची प्री-ऑर्डर करू शकता.

लाँचच्या एक दिवस अगोदर Google Pixel 8 Pro चा अनबॉक्सिंग व्हिडिओ समोर आला आहे.

बहुप्रतिक्षित Google Pixel 8 सिरीज उद्या ‘मेड बाय गुगल इव्हेंट’ 2023 मध्ये लाँच होईल. सीरीज अंतर्गत, कंपनी Google Pixel 8 आणि Google Pixel 8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. लाँच होण्यापूर्वीच, कंपनीने प्री-ऑर्डर तपशील देखील उघड केला आहे. तुम्ही उद्यापासून म्हणजेच ४ ऑक्टोबरपासून फोनची प्री-ऑर्डर करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनबद्दल बरेच तपशील समोर आले आहेत.

त्यानंतर, लाँचच्या एक दिवस अगोदर Google Pixel 8 Pro चा अनबॉक्सिंग व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये स्मार्टफोनचे डिझाइन आणि सर्व स्पेसिफिकेशन्स समजतील. एवढेच नाही तर, आगामी सिरीजची अपेक्षित किमंत देखील पुढे आली आहे.

होय, लोकप्रिय टिपस्टर अभिषेक यादवने त्याच्या अधिकृत X (ट्विटर) अकाउंटवर अनबॉक्सिंग व्हिडिओ, Google Pixel 8 Pro ची फीचर्स आणि किंमत उघड केली आहे. त्याच्या ट्विटमध्ये त्याने PBK Reviews ने बनवलेला फोनचा अनबॉक्सिंग व्हिडिओ शेअर केला आहे.

अपेक्षित किंमत

ट्विटनुसार, Google हा Pixel फोन $899 म्हणजेच 73,776 रुपयांमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन ऑब्सिडियन, पोर्सिलीन आणि बे कलर ऑप्शन्समध्ये येईल. मात्र लक्षात घ्या की, कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Google Pixel 8 Series

Google Pixel 8 सीरिजचे लीक स्पेसिफिकेशन्स

लीकनुसार, फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा QHD+ LTPO OLED डिस्प्ले असेल, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे. स्मार्टफोनमध्ये Tensor G3 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. हा फोन गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शनसह येईल. हा स्मार्टफोन Android 14 सह येईल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 48MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सरसह 48MP टेलिफोटो पेरिस्कोप लेन्स असेल. यात 5050mAh बॅटरी असेल, जी 50W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करेल. लक्षात घ्या की, फोनचे कन्फर्म तपशील देखील लाँचनंतरच माहित होतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo