Google Pixel 7a मागील सिरीजपेक्षा असेल अधिक प्रीमियम, बघा काय असेल खास…
स्मार्टफोनसोबत अनेक नवीन अपग्रेड्स येत आहेत.
Google Pixel 7a मध्ये टेलिफोटो सेन्सर समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
Google Pixel-A सिरीजला आता वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल.
फ्लॅगशिप Google Pixel 7 सिरीज लाँच केल्यानंतर, टेक जायंट आपल्या वापरकर्त्यांसाठी Google Pixel 7a आणण्याची तयारी करत आहे. परवडणाऱ्या मिड-रेंजरला फ्लॅगशिप-ग्रेड कॅमेरा, वायरलेस चार्जिंग आणि सिरेमिक बॉडी यांसारखे नवीन अपग्रेड्स मिळण्याची अपेक्षा आहे. Google Pixel 7a चे कोडनेम "Lynx" असण्याची शक्यता आहे आणि अहवालानुसार, नवीन लीक्स सूचित करतात की फोन जुन्या Pixel A-सिरीजपेक्षा अधिक प्रीमियम असू शकतो.
हे सुद्धा वाचा : आता मनसोक्त गाणी ऐका ! Spotify प्रीमियम 6 महिने मोफत वापरा, 'या' दिवशी संपणार जबरदस्त ऑफर
Google Pixel 7A स्पेसिफिकेशन्स
9to5Google च्या रिपोर्टप्रमाणे, 2023 मध्ये, Google Pixel 7a फ्लॅगशिप कॅमेरा, वायरलेस चार्जिंग आणि बरेच काही आणेल. फोन Tensor G2 चिपद्वारे समर्थित असण्याची शक्यता आहे. बर्याच अपग्रेडसह, वापरकर्त्यांना यावेळी Google Pixel-A सिरीज मॉडेल्समध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट पहायला मिळेल. मात्र अहवालानुसार, Google Pixel 7a ची वायरलेस चार्जिंग चिप- P922 फक्त 5W चार्जिंगसाठी सक्षम असेल.
टेक दिग्गज डिव्हाइसमध्ये एक टेलीफोटो सेन्सर समाविष्ट करू शकतो, जो हे फंक्शन वापरणारा पहिला पिक्सेल A-सीरीज फोन असेल. हे फिचर Vanilla Pixel 7 मध्ये दिले गेले नाही.
Google Pixel 6A स्पेक्स
Google Pixel 6a मध्ये 6.1-इंच फुल-HD+ OLED पॅनेल आहे जो HDR ला सपोर्ट करतो आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आहे. 6a ला पॉवरिंग Google च्या इन-हाउस टेन्सर चिपद्वारे केले जाते. डिव्हाइसला 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. तुम्हाला Google One वरून 100 GB क्लाउड स्टोरेज मिळते. 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 4,306mAh बॅटरी यामध्ये आहे.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Pixel 6a मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 12.2MP वाइड आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेराबद्दल बोलायचे झाले, तर फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. Google Pixel 6a Android 12 वर काम करतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile