लाँचच्या दुसर्या दिवशी भारतीय बाजारपेठेत फोन उपलब्ध होणार
बघुयात आगामी स्मार्टफोनची संभावित किंमत
Google चा बहुप्रतीक्षित फोन Google Pixel 7a लवकरच लाँच होणार आहे. कंपनीने ट्विटरवर जाहीर केले आहे की, लेटेस्ट पिक्सेल फोन भारतात 11 मे रोजी लाँच केला जाणार आहे. तर, फ्लिपकार्टद्वारे खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. Google ने अद्याप आगामी फोनच्या नावाबद्दल काहीही पुष्टी केलेली नाही. परंतु टीझर इमेज आणि लॉन्च टाइमलाइननुसार हे समजले की, Pixel 7a भारतात या महिन्यात लाँच होईल.
Google I/O इव्हेंट
Google ने शेअर केलेला अधिकृत फोटो पूर्वीच्या Pixel A आणि फ्लॅगशिप फोनचा डिझाईन दाखवतो. कंपनी त्यांच्या आगामी Google I/O इव्हेंटमध्ये Pixel 7a लाँच करणार आहे, जो 10 मे रोजी होणार आहे. लाँचच्या दुसर्या दिवशी भारतीय बाजारपेठेत फोन उपलब्ध करून दिला जाईल.
आगामी स्मार्टफोनची संभावित किंमत
वर सांगितल्याप्रमाणे हा फोन 11 मे रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. लीकनुसार, आगामी फोनची संभाव्य किंमत 35,000 रुपये असण्याची शक्यता आहे.
संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
या 5G फोनमध्ये FHD+ रिझोल्यूशनसह 6.1-इंच OLED स्क्रीन आणि 90Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्टसह येण्याची शक्यता आहे. Pixel 7a गुगलच्या टेन्सर G2 चिपसेटसह सुसज्ज असू शकतो. कंपनीने पिक्सेल 6 सिरीज लाँचसह त्याचा होम-ब्रूड चिपसेट वापरण्यास सुरुवात केली.
त्याबरोबरच, Pixel 7aमध्ये 4410mAh बॅटरी असू शकते. रिपोर्टनुसार, याच्या बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाहीये. कॅमेराबद्दल बोलायचे झाल्यास, फोटो आणि व्हिडिओसाठी यात ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो. ज्यात 64MP सोनी IMX787 प्रायमरी कॅमेरा आहे. लाँचनंतर वरील सर्व माहितीची पुष्टी होणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.