Google ने अलीकडेच जागतिक स्तरावर आपल्या Pixel सिरीजअंतर्गत Pixel 7 आणि Pixel 7 Pro हे दोन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता कंपनी अफोर्डेबल ए-सिरीजचा विस्तार करणार आहे. कंपनीच्या नवीन Google Pixel 7a लाँच करण्याबाबत दावे केले जात आहेत. यासोबतच या फोनच्या स्पेसिफिकेशनची माहितीही लीक झाली आहे. लीक्सनुसार, फोन फ्लॅगशिप कॅमेरा सेन्सरसह ऑफर केला जाईल.
हे सुद्धा वाचा : BGMI: Battlegrounds Mobile India लवकरच भारतात परतणार, सरकार कंपनीवरील बॅन हटवणार ?
अद्याप गुगलने या फोनची अधिकृत घोषणा केलेली नाही. Android च्या ओपन-सोर्स कोडच्या पब्लिक कन्व्हरसेशनने पुष्टी केली आहे की, Google नवीन Pixel 7a स्मार्टफोनवर काम करत आहे आणि फोन 2023 च्या सुरुवातीला लॉन्च केला जाऊ शकतो. लीक्समध्ये या डिव्हाईसचे कोडनेम Lynx देखील समोर आले आहे. तुम्हाला माहिती आहे का की, Google A-सिरीजचे फोन परवडणाऱ्या किमतीत दिले जातात. Google Pixel 7a हा Google Pixel 6a च्या अपग्रेड राउंडवर सादर केला जाईल. मिड-रेंज स्मार्टफोन Google Pixel 6a कंपनीने याच वर्षी ऑगस्टमध्ये लाँच केला होता.
Google Pixel 7a फ्लॅगशिप स्पेसिफिकेशनसह ऑफर केला जाईल. Google Pixel 7a मधील Pixel 7 प्रमाणे, Tensor G2 प्रोसेसर समर्थित असेल. तर, फोन सिरॅमिक बॉडी डिझाइनसह सादर केला जाईल. Google Pixel 7a सह 5W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल. वायरलेस चार्जिंगसाठी फोनमध्ये P9222 चिपसेटसाठी सपोर्ट देखील मिळू शकतो.
फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले, तर सॅमसंगचा फ्लॅगशिप 50 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर यामध्ये आढळू शकतो. तर, फोन 64 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि 13 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सरने सुसज्ज असण्याची शक्यता आहे.