प्रतीक्षा संपली ! Google Pixel 7a अखेर लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे का ?
Google चा Google I/O 2023 इव्हेंट अखेर पार पडला.
बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Pixel 7a लाँच
नवीन हँडसेटची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये
Google चा Google I/O 2023 इव्हेंट अखेर पार पडला. Google ने Google I/O 2023 डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Pixel 7a लाँच केला आहे. इव्हेंटमध्ये कंपनीने 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन सादर केला आहे. Pixel 7 सिरीजच्या नवीन हँडसेटची किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि उपलब्धता बघुयात-
Google Pixel 7a ची किंमत
Pixel 7 सिरीजच्या नवीन हँडसेटची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे. नवीनतम स्मार्टफोनची विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टद्वारे केली जाणार आहे. Google च्या नवीन फोनमध्ये तुम्हाला चारकोल, सी आणि स्नो असे तीन कलर ऑप्शन्स मिळतील. त्याबरोबरच, HDFC बँक कार्डने व्यवहार केल्यास फ्लिपकार्टवर 4,000 रुपयांपर्यंतची सूट देखील मिळणार आहे.
Google Pixel 7a चे स्पेसिफिकेशन्स
Built to perform, big on features
The all-new #Pixel7a is now here, packed with your favourite features like Photo Unblur, Magic Eraser and Night Sight. Available in 3 beautiful colours – Sea , Charcoal and Snow
Order here: https://t.co/EItZMSdZkn#TeamPixel… pic.twitter.com/ADhsxwRYZ0
— Google India (@GoogleIndia) May 10, 2023
Google Pixel 7A स्मार्टफोनमध्ये 6.1-इंच लांबीच्या FHD+ डिस्प्ले मिळणार आहे, ज्यात 90hz चा रिफ्रेश रेट आहे. कंपनीने Pixel 7A मध्ये Tensor G2 चिपसेट दिला आहे. हा चिपसेट Pixel 7 आणि Pixel 7 Pro मध्ये देखील वापरला जातो.
याव्यतिरिक्त, Google च्या फोनमध्ये 4300 mAh ची बॅटरी आहे, त्यासह फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे. त्याबरोबरच, यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला 64MP मेन कॅमेरा आणि 13MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला गेला आहे. तसेच, 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile