Google Pixel 7: Google च्या फ्लॅगशिप फोनची पहिली विक्री आज, मिळतेय 8,500 रुपयांपर्यंत सूट

Updated on 28-Dec-2022
HIGHLIGHTS

Google Pixel 7 सिरीजची विक्री सुरु

Google Pixel 7 ची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये

कंपनी विशेष ऑफर म्हणून दोन्ही स्मार्टफोन्सवर भारी कॅशबॅक ऑर करतेय

Google च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Google Pixel 7 ची पहिली विक्री आज भारतात सुरू झाली आहे. या सीरिज अंतर्गत Pixel 7 आणि Pixel 7 Pro खरेदी करता येईल. Pixel 7 ची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये आहे आणि Pixel 7 Pro ची सुरुवातीची किंमत 84,999 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. 6 ऑक्टोबर रोजी Google ने वर्षातील सर्वात हॉट इव्हेंटमध्ये आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Pixel 7 सीरीज लाँच केली.

हे सुद्धा वाचा : 'भारत कभी झुकेगा नही..' ! साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन 'इंडियन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित

बघा ऑफर्स :

Google Pixel 7 ची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये आहे आणि Pixel 7 Pro ची सुरुवातीची किंमत 84,999 रुपये आहे. Google Pixel 7 Snow, Obsidian आणि Lemongrass कलरमध्ये आणि Pixel 7 Pro Hazel, Obsidian आणि Snow कलर पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. कंपनी विशेष ऑफर म्हणून Pixel 7 वर रु. 6,000 आणि Pixel 7 Pro वर रु. 8,500 चा कॅशबॅक देत आहे.

Pixel 7 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Pixel 7 फोन 2,400 x 1,080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह 6.32-इंच लांबीचा फुल HD + OLED डिस्प्ले दाखवतो.  Google Pixel 7 सिक्योरिटीसाठी Google च्या Tensor G2 प्रोसेसर आणि Titan M2 प्रोसेसरला सपोर्ट करतो. फोन Android 13 सह येतो, यात 8 GB RAM सह 128 GB पर्यंत स्टोरेज आहे. Google Pixel 7 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि दुसरा लेन्स 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगलचा आहे. फोनमध्ये 10.8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Pixel 7 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 7 Pro फोन 3,120 x 1,440 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा LTPO OLED डिस्प्ले दाखवतो. स्मार्टफोनमध्ये Tensor G2 प्रोसेसरसह टायटन M2 प्रोसेसर सुरक्षिततेसाठी समर्थित आहे. Pixel 7 Pro मध्ये 12 GB RAM सह 128 GB स्टोरेज उपलब्ध आहे.

Google Pixel 7 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. प्रायमरी कॅमेरासह 2X झूम उपलब्ध आहे. दुसऱ्या लेन्सला 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा 48 मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेन्स आहे. फोनमध्ये 10.8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, फोन 5G, 4G LTE, Wi-Fi 6E, ब्लूटूथ 5.2, GPS, NFC आणि USB टाइप-C पोर्टला सपोर्ट करतो. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :