Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro ची किंमत लाँचपूर्वी लीक, जाणून घ्या अपेक्षित किमंत

Updated on 28-Dec-2022
HIGHLIGHTS

Google Pixel 7 सिरीजची किमंत लीक

Google Pixel 7 सीरीज पुढील महिन्यात भारतात लाँच होणार

जाणून घ्या, नव्या स्मार्टफोन्सची अपेक्षित किंमत

टेक कंपनी Google ने पुष्टी केली आहे की, त्यांची फ्लॅगशिप Google Pixel 7 सीरीज पुढील महिन्यात भारतीय बाजारात देखील लाँच केली जाईल. भारतातील ग्राहक बऱ्याच काळापासून Pixel फ्लॅगशिप लाँच होण्याची वाट पाहत आहेत. या डिव्हाइसशी संबंधित लीक बऱ्याच काळापासून समोर येत आहेत. कंपनीने I/O 2022 इव्हेंटमध्ये या उपकरणाचा फर्स्ट लुक शेअर केला होता आणि आता नवीन उपकरणांची किंमत समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Redmi फोनवरील सर्वोत्तम डील्स…

लीकवर विश्वास ठेवला तर, Pixel 7 ची किंमत $599 पासून म्हणजेच भारतीय चलनात 48,600 रुपयांच्या जवळपास आहे. तर, कंपनी Pixel 7 Pro ला $899 किंवा सुमारे 72,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करेल, अशी अपेक्षा आहे.

गुगल उपकरणांची किंमत भारतात वेगळी असेल

नुकत्याच समोर आलेल्या Google Pixel 7 सिरीजमधील डिव्‍हाइसेसची किंमत जरी लॉन्‍च झाल्यानंतर खरी ठरली, तरी भारतीय बाजारपेठेतील त्याची किंमत वेगळी असेल. Apple प्रमाणेच, Google देखील आपले Pixel डिव्हाइसेस भारतात आयात करते, ज्यामुळे डिव्हाइसवर अनेक प्रकारचे कर आणि शुल्क आकारले जातात आणि त्यामुळे या उपकरणांची किंमत वाढते.

Google Pixel 7 सिरीजमध्ये 'हे' अपग्रेड होऊ शकतात

गुगलचा अपग्रेड केलेला इन-हाउस टेन्सर प्रोसेसर नवीन मॉडेल्समध्ये आढळू शकतो. Tensor G2 सह थर्मल परफॉर्मन्स, नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि FP किंवा कॅमेरा परफॉर्मन्स सुधारले जाऊ शकते. तसेच, वापरकर्ते डिव्हाइसच्या फोटोग्राफी परफॉर्मन्सशी संबंधित अपग्रेड मिळवू शकतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :