Google पुढील काही दिवसात आपल्या Pixel सीरीजचा नवीनतम फ्लॅगशिप डिवाइस Pixel 7 Pro लाँच करणार आहे आणि त्याच्याशी संबंधित लीक्स देखील समोर येत आहेत. विशेष म्हणजे आता या उपकरणाचा अनबॉक्सिंग व्हिडिओ समोर आला आहे. डिव्हाइसचे प्रीमियम डिझाइन व्हिडिओमध्ये दिसतेय.
हे सुद्धा वाचा : 200MP कॅमेरा असलेला MOTOROLAचा आकर्षक फोन भारतात येणार, 7 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये चालेल 12 तास
Pixel 7 Pro ची समान डिझाईन सर्व लीक्समध्ये दिसली आहे आणि याची पुष्टी झाली आहे. आता अनबॉक्सिंग व्हिडिओ समोर आला आहे म्हणजेच सर्च इंजिन कंपनी लवकरच लाँच करू शकते. या डिव्हाइसचे प्रोटोटाइप पूर्वी eBay आणि Reddit वर देखील पाहिले गेले होते.
https://twitter.com/ytechb/status/1566618350624522241?ref_src=twsrc%5Etfw
रेंडर्स आणि लीक्सने सूचित केले आहे की, नवीन फ्लॅगशिप पिक्सेल 7 सिरीज डिव्हाइसेस मागील पिक्सेल 6 सिरीजपेक्षा पातळ असतील. याशिवाय त्यांच्या डिस्प्लेवर थिन बेझल्स दिले जातील. मागील पॅनलवरील ऍल्युमिनियम फ्रेममध्ये तीन कॅमेरा सेन्सरसाठी कटआउट्स आणि मध्यभागी Google लोगो आहे. कंपनी या उपकरणांना निवडक कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे.
मागील रिपोर्ट्सनुसार, Pixel 7 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आणि Pixel 7 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP मेन सेन्सर व्यतिरिक्त, अल्ट्रा-वाइड आणि मायक्रो सेन्सर मिळू शकतात. हा फोन सेल्फी कॅमेरासह 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट येण्याची शक्यता आहे. Android 13 सपोर्टसह, हे डिव्हाइस 12GB पर्यंत RAM ला सपोर्ट करेल.