Google Pixel 7 वर बंपर डिस्काउंट, फ्लॅगशिप फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Updated on 26-Apr-2023
HIGHLIGHTS

Google Pixel 7 वर बंपर डिस्काउंट

फोनवर 15 हजार 799 रुपयांची मोठी सवलत

फ्लॅगशिप फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेन्सर मिळेल.

Google Pixel 7 गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 59 हजार 999 रुपये किमतीत लाँच करण्यात आला होता. हा फ्लॅगशिप फोन सध्या कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. सध्या हा Pixel स्मार्टफोन Amazon वर 15 हजार 799 रुपयांच्या बंपर डिस्काउंटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. यावर अतिरिक्त ऑफर्स देखील मिळणार आहेत. 

Google Pixel 7 वरील ऑफर्स

आता Amazon वर Google Pixel 7 चा 8 GB रॅम व्हेरिएंट 15 हजार 799 रुपयांच्या मोठ्या सवलतीनंतर उपलब्ध आहे. ऍमेझॉनवर हा फोन 44 हजार 200 रुपयांना सूचिबद्ध आहे. यासह, नो कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. ऑफरसह तुम्ही हा स्मार्टफोन सहज खरेदी करू शकता. फोनची किंमत आणि ऑफर्स जवळपास बदलत राहण्याची शक्यता आहे. 

Google Pixel 7 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 6.3-इंच लांबीची मोठी स्क्रीन आहे, जी फुल HD प्लस रिझोल्यूशन देते. यासह तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. या डिव्हाइसमध्ये Tensor G2 प्रोसेसरसह 8 GB रॅम आणि 128GB चे इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. हा Google फोन लेटेस्ट Android 13 वर चालतो. डिव्हाइसला तीन वर्षांसाठी अँड्रॉइड अपग्रेड आणि पाच वर्षांसाठी सिक्योरिटी अपडेट्स मिळतील.

या फ्लॅगशिप फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेन्सर मिळेल, प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. तसेच 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळेल. त्याबरोबरच, व्हिडिओ कॉलिंगसाठी तुम्हाला 10.8 मेगापिक्सलचा फ्रंट सेंसर मिळणार आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :