अवघ्या दोन दिवसांनी म्हणजे 11 मे रोजी Google Pixel 7a लाँच होणार आहे. Google Pixel 7A ही कंपनीच्या सध्याच्या मॉडेल Google Pixel 6A चे अपग्रेड वर्जन असणार आहे. Google Pixel 7A च्या अधिकृत लॉन्चपूर्वी Pixel 6A स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. हा फोन 16 हजारांपर्यंत स्वस्त मिळत आहे.
या डिव्हाईसमध्ये फुल HD+ रिझोल्यूशनसह गुगलचा टेन्सर प्रोसेसर आहे. फोनच्या मागील बाजूस 12 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे, प्राथमिक सेन्सरसह अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि सेल्फी लव्हर्ससाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.
Google Pixel 6A चा 6GB रॅम व्हेरिएंट 43,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र, आता फ्लिपकार्टवर हा फोन केवळ 27 हजार 999 रुपयांना सूचिबद्ध आहे. म्हणजेच गुगलचा हा फोन लाँच प्राईसपेक्षा 16 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे.
एवढेच नाही, SBI क्रेडिट कार्डच्या EMI व्यवहारांवर 10% झटपट सूट दिली जाणार आहे. जर तुम्हाला EMI वर फोन घ्यायचा असेल तर, फोनसोबत 985 रुपये प्रति महिना प्रारंभिक EMI ची सुविधा देखील मिळणार आहे. तसेच, तुम्ही एक्सचेंज ऑफरचा ही लाभ घेऊ शकता. या डिव्हाइसवर 26 हजार 250 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट उपलब्ध आहे.