जर तुम्ही प्रीमियम सेगमेंट स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर Google Pixel 6a तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. गुगलचा हा स्मार्टफोन या वर्षी जुलैमध्ये भारतात लाँच करण्यात आला होता. 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची MRP फ्लिपकार्टवर 43,999 रुपये आहे. आता 20% सवलतीनंतर 34,999 रुपयांना खरेदी करता येईल. त्याबरोबरच, हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास तुम्हाला 2 हजार रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. या दोन्ही ऑफरसह, फोनवर एकूण सवलत 11,000 रुपयांची होणार आहे. येथून खरेदी करा…
हे सुद्धा वाचा : फोटोग्राफी करण्याची मजा द्विगुणित होणार, Xiaomi चा 200 MP कॅमेरा फोन लवकरच भारतात येणार
फोनमध्ये, कंपनी 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.1-इंच फुल HD + OLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश दर आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येतो. Google Pixel 6a स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये कंपनी टायटन M 2 को-प्रोसेसरसह गुगल टेन्सर चिपसेट देत आहे.
या फोनमध्ये 4410mAh बॅटरी आहे, ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन Android 12 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी 5G, Nano SIM, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देत आहे.
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 12.2-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. कंपनी सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. हा फोन चॉक आणि चारकोल कलर वेरिएंटमध्ये येतो.