40 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतोय Google Pixel 6, पण खरेदी करणे पडेल का महागात ?
Google Pixel 6 स्मार्टफोन 37,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Google Pixel 6 वर Amazon वर प्रचंड सूट मिळत आहे.
Google Pixel 6 खरेदी करणे तुम्हाला महागात का पडू शकतो?
भारतातील Google Pixel 6 ची किंमत यावेळी भारतीय ग्राहकांसाठी कमी करण्यात आली आहे. पिक्सेल स्मार्टफोन्स त्यांच्या डिझाइन, शार्प डिस्प्ले, कॅमेरा, कस्टमाइझ करण्यायोग्य इंटरफेस इत्यादींमुळे चांगलेच पसंत केले जातात. हाच स्मार्टफोन सध्या Amazon वर 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही Amazon India वरून Google Pixel 6 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा आणि विचार करा. जाणून घ्या कारण…
हे सुद्धा वाचा : Google Maps वर पाहता येईल Toll Price, बघा स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया…
Google Pixel 6 ची किंमत
Google Pixel 6 चा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon India वर 37,999 रुपयांना उपलब्ध आहे. वापरकर्ते बँक डिस्काउंट देखील घेऊ शकतात ज्यानंतर फोनची किंमत आणखी खाली येईल.
स्मरणार्थ, 2021 मध्ये, Google ने Pixel 6 आणि Pixel 6 Pro अनुक्रमे $599 म्हणजेच अंदाजे रु. 50,000 आणि $899 म्हणजेच अंदाजे रु. 74,415 च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केले होते. दोन्ही फोन जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आले होते, परंतु भारतात आणले गेले नाहीत. टेक जायंटने याचे कारण ग्लोबल डिमांड आणि सप्लायला दिले आहे. नंतर, 2022 मध्ये कंपनीने भारतात Google Pixel 6a लाँच केले.
Amazon पेज दर्शवितो की, Google Pixel 6 हे इंपोर्टेड प्रोडक्ट आहे आणि विक्रेता त्यावर एक वर्षाची वॉरंटी ऑफर करतो. लक्षात ठेवा की, हा एक Google स्मार्टफोन आहे, परंतु कंपनी उत्पादनावर कोणतीही वॉरंटी देत नाही आणि विक्रेत्याला Amazon वर खूप कमी उत्तम रिव्युज मिळाले आहेत.
आणि म्हणूनच, तुम्ही Google Pixel 6 वगळू शकता आणि Google Pixel 7 किंवा Pixel 7 Pro चा विचार करू शकता, जे 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत भारतात लाँच केले गेले होते.
Google Pixel 6 चे स्पेक्स
Google Pixel 6 ला 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.4-इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले मिळतो. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये f/1.85 अपर्चरसह 50MP मुख्य Samsung GN1 सेन्सर आणि f/2.2 अपर्चरसह 12MP Sony IMX386 अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आहे.
हा स्मार्टफोन Google Tensor चिपसेटसह Mali-G78 GPU आणि Titan M2 सिक्युरिटी चिप द्वारे समर्थित आहे. त्याबरोबरच, यात 30W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 21W वायरलेस चार्जिंग समर्थनासह 4,614mAh बॅटरी आहे. प्रोटेक्शनसाठी फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. फीचर्समध्ये USB टाइप-सी पोर्ट, 5G SA/NA, 4G VoLTE, Wi-Fi 6E समाविष्ट आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile