Google Pixel 3 ‘Lite वेरिएंट्स बद्दल अनेक रुमर्स आणि लीक्स आधीपण समोर आले आहेत पण मिळालेल्या नवीन माहिती वरून अंदाज लावला जाऊ शकतो कि कदाचित याला Google Pixel 3 Lite XL म्हटले जाणार नाही. गीकबेंच च्या लिस्टिंग वरून समजते कि गूगल आपल्या Pixel 3 फ्लॅगशिपच्या Lite वेरिएंट्स साठी नवीन नाव निवडू शकते.
बेंचमार्क लिस्टिंग नुसार, Pixel 3 XL च्या Lite वेरिएंटला नवीन नाव दिले जाऊ शकते , लॉग मध्ये Google Pixel 3 XL Lite ऐवजी डिवाइस Google Pixel 3a XL नावाने रेफर केला गेला आहे. परफॉरमेंस स्कोर बद्दल बोलायचे तर Google Pixel 3a XL मोठ्या Google Pixel 3 आणि Pixel 3 XL च्या अर्ध्या स्कोर्स पर्यंत पोहचला आहे. डिवाइसला सिंगल कोर टेस्ट मध्ये 1,640 स्कोर आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 4,973 पॉइंट्स मिळाले आहेत.
गीकबेंच लिस्टिंग वरून प्रोसेसरची माहिती मिळाली नाही, असा अंदाज लावला जात आहे कि गूगल या फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 710 SoC चा समावेश करेल. लिस्टिंग मध्ये फक्त ओक्टा-कोर क्वालकॉम प्रोसेसर दिसत आहे जो 1.71GHz वर क्लोक्ड आहे. तसेच या स्मार्टफोन लिस्टिंग मध्ये हा 4GB रॅम सह दिसत आहे.
याआधी कथित स्मार्टफोन Foxconn Pixel 3 XL नावाने गीकबेंच वर लिस्टे केला गेला होता. खुलासा झाला होता कि हा हँडसेट 6GB रॅम सह येईल जी खूप धक्कादायक बाब होती कारण ओरिजिनल Pixel 3 आणि Pixel 3 XL मध्ये 4GB रॅम देण्यात आला होता.
गूगल ने अजूनतरी या आगामी Pixel 3 स्मार्टफोन्स बद्दल माहिती दिलेली नाही तसेच यांच्या लॉन्च संबंधित पण कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सर्च जायंट 7 मे ते 9 मी दरम्यान आपल्या एनुअल डेवलपर कांफ्रेंस I/O 2019 चे अफयोजन करणार आहे.