Google Pixel 3 and Google Pixel 3 XL Render Leak : काही दिवसांपूर्वी Google Pixel 3 स्मार्टफोन चा प्रोटोटाइप समोर आला होता आणि आता या डिवाइस चा CAD रेंडर समोर आला आहे. तसेच Google Pixel 3 XL पण लीक झाला आहे. या लीक मध्ये हा स्मार्टफोन प्रत्येक एंगल ने समोर आला आहे. या लीक साठी आपण @OnLeaks आणि MySmartPrice यांचे आभार मानले पाहिजेत.
असे समोर येत आहे की या डिवाइस बद्दल गूगल कडून याच्या डिजाईन मध्ये काही जास्त बदल करण्यात येणार नाही. असेही बोलले जात आहे की हा मागच्या पिढीच्या स्मार्टफोंस शी खुप मिळता जुळता असेल. पण तरीही यात काही बदल बघायला मिळतील. या दोन्ही फोंस च्या फ्रंटला तुम्हाला एक फुल-स्क्रीन डिस्प्ले मिळणार आहे आणि बेजल्स खुप कमी म्हणजे स्लिम करण्यात आले आहे. पण टॉप आणि बॉटम ला तुम्हाला थिक बेजल्स दिसतील. याव्यतिरिक्त दोन्ही स्मार्टफोंस स्टीरियो स्पीकर्स, ड्यूल कॅमेरा मोड्यूल सह लॉन्च केले जाऊ शकतात, तसेच फेस रिकग्निशन पण यात तुम्हाला मिळू शकते.
Google Pixel 3 XL स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला एक नॉच डिजाईन मिळणार आहे. तसेच याचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो पण हाई असेल. पण अॅप्पल ने नॉच चा वापर आपला एज-टू-एज डिस्प्ले एक्सपीरियंस देण्यासाठी केला होता.
प्रसिद्ध लीकर Steve H ने ट्विटर च्या माध्यमातून या नवीन आगामी डिवाइस बद्दल माहिती दिली आहे. त्यांच्या
सोर्स नुसार, Pixel 3 मध्ये 5.3 इंचाचा डिस्प्ले असेल, तर Pixel 3XL मध्ये 6.2 इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल ज्याच्या टॉप वर एक नॉच असेल.
नेहमी गूगल आपले फोन्स ऑक्टोबर च्या सुरवातीला लॉन्च करतो पण यावर्षी आशा व्यक्त केली जात आहे की कंपनी काही वेगळे करू शकते. मागच्या लीक फोटो वरून ग्लास पॅनल ची माहिती मिळाली आहे. या फोटो वरून फ्रंटला असलेल्या स्टीरियो स्पीकर्स ची पण माहिती मिळाली आहे.
लॉन्च च्या वेळी हे फोन्स स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट आणि एंड्राइड P सह येऊ शकतात. हे तेव्हाच समजेल की गूगल डुअल किंवा ट्रिपल कॅमेरा चा ट्रेंड चा वापर करेल की एक सेंसर सह युनीक इमेज प्रोसेसिंग ऑफर करेल.
आश्चर्यकारक बाब नाही की गूगल आपल्या स्मार्टफोन्स मध्ये नॉच डिजाइन घेऊन येत आहे, कारण सर्च जायंट ने एंड्राइड P मध्ये आपल्या नॉच फंक्शनालिटी पण सामील केली आहे.
एक अन्य रिपोर्ट वरून समजले आहे की गूगल FIH मोबाईल सोबत मिळून स्वतः Pixel 3 स्मार्टफोंस बनवेल. FIH मोबाईल Foxconn ची सहायक कंपनी आहे. याआधी LG, Huawei आणि HTC ने मिळून कंपनी साठी डिवाइस बनवले होते.