गुगलद्वारा अलीकडेच लाँच केल्या गेलेल्या स्मार्टफोन नेक्सस 5X च्या किंमतीत प्रचंड प्रमाणात घट कऱण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनचे निर्माण एलजीने केले आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनची किंमत ७००० रुपयांनी कमी केली आहे. तसे कंपनीद्वारा एलजी नेक्सस 5X च्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली आहे. गुगल प्ले स्टोरवर आताही नेक्सस 5X ची किंमत 31,900 आणि 32GB ची किंमत 35,900 रुपये आहे.
भारतात गुगल एलजी नेक्सस 5X ला अधिकृतरित्या ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर लाँच केले गेले होते. लाँचच्या वेळी ह्याला ३१, ९०० रुपयात सादर केले गेले होते, मात्र आता ह्याची किंमत २४,४८९ रुपये करण्यात आली आहे, जी की एक सर्वात मोठी घसरण आहे.
एलजी नेक्सस 5X 32GB मॉडेल अॅंमेझॉन इंडियावर २४,४८९ रुपयांत उपलब्ध आहे, ज्याला भारतात ३५,९०० रुपयात लाँच केले गेले होते. हा फोन फ्लिपकार्टवरसुद्धा उपलब्ध आहे, जेथे 16GB मॉडेलची किंमत २४,४९४ रुपये आणि 32GB मॉडेलची किंमत २९, ८९७ रुपये आहे.
एलजी नेक्सस 5X च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर ह्यात 5.2 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एमएसएम 8992 चिपसेट, 1.8GHz चे हेक्साकोर प्रोसेसर आणि 2GB चे रॅम असेल. हा स्मार्टफोन 16GB/32GBच्या अंतर्गत मेमरी पर्यायासह उपलब्ध होईल.
हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. एलजी नेक्सस 5X मध्ये १२.३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलची फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.