गुगलने मागील वर्षी बाजारात आपले दोन नवीन नेक्सस स्मार्टफोन्स सादर केले होते. नेक्सस 5X स्मार्टफोनच्या 16GB व्हर्जनची सर्वसामान्य किंमत २७,९०० रुपये आणि 32GB व्हर्जनची किंमत ३१,९०० रुपये आहे. आता गुगल आपल्या नेक्सस 5X स्मार्टफोनवर एक उत्कृष्ट डिस्काउंट ऑफर देत आहे. ह्या ऑफर अंतर्गत गुगल नेक्सस 5X वर २७ मार्चपर्यंत ४,००० पर्यंत सूट मिळत आहे.
ह्या सूटचा लाभ नेक्सस 5X स्मार्टफोनला गुगल स्टोरवर ऑनलाइन खरेदी केल्यावरच घेता येईल. ह्या ऑफरद्वारे नेक्सस 5X च्या 16GB व्हर्जनला २३,९९० रुपये आणि 32GB व्हर्जनला २७,९०० रुपयांमध्ये खरेदी करु शकता.
नेक्सस 5X स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.2 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन MSM 8992 चिपसेट, 1.8GHz चे हेक्साकोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन 16GB/32GB च्या अंतर्गत स्टोरेज पर्यायासह उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. एलजी नेक्सस 5X मध्ये १२ मेगापिक्सेलचा रियर आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 2700mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात क्विक चार्ज सपोर्ट आहे. १० मिनिटाच्या चार्जमध्ये यूजरला ३.८ तासापर्यंत बॅटरी पॉवर मिळेल. हा स्मार्टफोन कार्बन ब्लॅक, क्वाटर्ज, व्हाइट आणि आइस ब्लू रंगात उपलब्ध होईल.
हेदेखील वाचा – ओप्पोने लाँच केला F1 ICC वर्ल्ड T20 लिमिटेड एडिशन स्मार्टफोन
हेदेखील वाचा – 3GB रॅमने सुसज्ज असलेले १२,००० च्या किंमतीत येणारे दोन उत्कृष्ट स्मार्टफोन्स