तुमचा फोन हरवला? Google ने आणला नवा ‘Find My Device’ फिचर, विना इंटरनेट शोधता येईल हरवलेला स्मार्टफोन। Tech News

Updated on 09-Apr-2024
HIGHLIGHTS

Google ने त्याच्या Find My Device फीचरसाठी नवीन अपडेट जारी केले.

हा Android च्या Find My Device प्रणालीच्या सुधारणेचा भाग आहे.

Google ने I/O 2023 इव्हेंटमध्ये या फिचरची घोषणा केली होती.

Google ने त्याच्या Find My Device फीचरसाठी नवीन अपडेट जारी केले आहे. हे फिचर वापरकर्त्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. या फीचरद्वारे आता नवीन Find My Device च्या मदतीने तुम्ही ऑफलाइन असतानाही तुमचा हरवलेला Android स्मार्टफोन शोधू शकता. हा Android च्या Find My Device प्रणालीच्या सुधारणेचा भाग आहे, असे सांगितले जात आहे. Google ने I/O 2023 इव्हेंटमध्ये या फिचरची घोषणा केली होती. दरम्यान, अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ते सर्व उपकरणांसाठी आणले जात आहे.

हे सुद्धा वाचा: Absolutely Lowest! 50MP मेन कॅमेरासह येणाऱ्या Oppo A38 स्मार्टफोनच्या किमतीत घट, तब्बल 3000 रुपयांची कपात।Tech News

Google चे New Find My Device

आम्ही तुम्हाला सांगतो की, Android च्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून या नवीन Find My Device ची माहिती देण्यात आली आहे. ”नवीन Find My Device ॲप जगभरातील अँड्रॉइड डिव्हाइसवर रोल आउट करण्यास सुरुवात झाली आहे” असे या ट्विटमध्ये लिहले आहे. एक अब्जाहून अधिक डिव्हाइसेसच्या क्राउडसोर्स नेटवर्कसह, Find My Device सह तुम्हाला तुमचे हरवलेले डिव्हाइस आणि दैनंदिन वस्तू जलद आणि सुरक्षितपणे शोधण्यात मदत होईल.

Find My Device प्रणालीमधील सुधारणा

वर सांगितल्याप्रमाणे, नवे फिचर Android च्या Find My Device प्रणालीच्या सुधारणेचा भाग आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Find My Device मधील महत्त्वाच्या बदलांपैकी एक म्हणजे Google ने Android 9.0 किंवा त्यापुढील वर्जनच्या एक अब्जाहून अधिक उपकरणांचे ‘क्राउडसोर्स्ड नेटवर्क’ तयार केले आहे. यासह तुमचा फोन किंवा टॅबलेट रेंजमध्ये असताना पिंग करू शकते. हे तंत्रज्ञान डिव्हाइसचे रिअल-टाइम लोकेशन उघड करण्यासाठी जवळपासच्या इलेक्ट्रॉनिक्समधील ब्लूटूथ सिग्नल देखील टॅप करू शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, तुमचा Android फोन हरवल्यास, जवळपासची Android डिव्हाइस इंटरनेट कनेक्शन नसतानाही ते शोधू शकतात.

उपलब्धता

हे फिचर सध्या Android 9 Pie डिव्हाइसेसवर आणि Google Play सेवा स्थापित केलेल्या नवीन उपकरणांवर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, Google Pixel 8/8 Pro सारख्या निवडक डिव्हाइसेसवर, तुमचे डिव्हाइस बंद असतानाही तुम्हाला ते सापडेल, असे Google ने सांगितले आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :