गुगलची ऑफलाईन मॅप सेवा आजपासून भारतात सुरु झाली आहे. ह्या सेवेचा लाभ सध्या तरी अॅनड्रॉईड ग्राहक घेऊ शकतो. गुगलने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ह्याविषयी माहिती दिली आहे.
गुगलने जवळपास एक आठवड्यापूर्वी ऑफलाईन सेवा आणली होती आणि त्यावेळी कंपनीने ह्याला अधिकृतरित्या रोलआऊट करण्याची घोषणा केली होती.
ही गुगल अॅप सेवा ह्याआधी इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होत होती. आता ऑफलाईनच्या माध्यमातून आपण मॅपचा उपयोग इंटरनेटशिवायही करु शकता. गुगलची ऑफलाईन मॅप सेवेचा लाभ घेण्यासाठी प्ले स्टोरवर आपल्याला मॅपला अपडेट करावे लागेल.
गुगल ऑफलाईन सेवेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मॅप डाऊनलो़ड करावा लागेल. मॅप डाऊनलोडिंग करण्यासाठी इंटरनेट असणे आवश्यक आहे. डाऊनलो़ड मॅप आपल्या फोनमध्ये सेव्ह केला जाईल आणि त्यानंतर आपण त्याचा उपयोग ऑफलाइन नेव्हिगेशनमध्येही करु शकता, मात्र त्यासाठी आपल्या फोनमध्ये GPS सेवा असली पाहिजे. ज्या स्मार्टफोन्समध्ये GPS नसेल त्या फोन्सवर ही सेवा काम करणार नाही.
गुगलची ऑफलाइन मॅप सेवा सध्यातरी फक्त अॅनड्रॉईड ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, मात्र कंपनीचा दावा आहे की, लवकरच ह्याला ISO साठीही लाँच केले जाईल.