अखेर आज Google फोनच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण बहुप्रतीक्षित Google Pixel 9 सिरीज आज ग्लोबली लाँच होणार आहे. होय, या वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम Made By Google आज म्हणजेच 13 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित केला जाणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनीच्या नेक्स्ट जनरेशन Google Pixel स्मार्टफोन्स सोबतच Pixel Watch 3 आणि Pixel Buds Pro 2 देखील लाँच केले जातील. त्याबरोबरच, Google आज आपला फोल्डेबल फोनचे देखील अनावरण करणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात Google Pixel 9 सिरीजचे लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: Redmi Note 13 Pro+ 5G मोठ्या Discount सह खरेदीसाठी उपलब्ध, जाणून घ्या नवी किंमत
Made By Google इव्हेंट आज म्हणजेच 13 ऑगस्ट 2024 रोजी 10 PT म्हणजेच भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 PM वाजता आयोजित केला जाईल. या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंगही केले जाणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा इव्हेंट Google च्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह असेल.
Made By Google इव्हेंटमध्ये बहुप्रतीक्षित आगामी Google Pixel 9 सीरीज लाँच केली जाणार आहे. या सिरीजअंतर्गत Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि Pixel 9 Pro Fold या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. याशिवाय, इव्हेंटदरम्यान Google Pixel Watch 3 आणि Pixel Buds Pro 2 देखील सादर केले जातील.
याव्यतिरिक्त, स्मार्टफोनसाठी Android 15 देखील लाँच केला जाईल. त्याबरोबरच, Google च्या सर्व्हिसेस आणि ॲप्सनाही अनेक अपग्रेड मिळू शकतात. विशेषतः कंपनी या इव्हेंटमध्ये AI शी संबंधित देखील अनेक घोषणा देखील करण्याची शक्यता आहे.