Google भारतासाठी एका नवीन स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वाल्या डिवाइस वर करत आहे काम, 2019 मध्ये केला जाऊ शकतो लॉन्च
फक्त भारतासाठी लॉन्च केल्या जाणार्या गूगल पिक्सल मिड-रेंज स्मार्टफोन वर चालू आहे काम, 2019 च्या सुरवातीला लॉन्च होण्याची शक्यता.
असे बोलले जात आहे की Google मध्य श्रेणी च्या पिक्सल फोन वर काम करत आहे. आम्ही तुम्हाला एप्रिल च्या सुरवातीला या प्रकारच्या अफवेच्या बातमी बद्दल सांगितले होते, पण आता असे वाटते की याला सत्यात आणण्यासाठी Google च्या योजना बनत आहेत. जर्मन 'स्कूप-मास्टर', रोलँड क्वांट च्या काही दिवसांपूर्वीच्या एका ट्वीट नुसार, Google निश्चितपणे पिक्सल फोन वर काम करत आहे जो नवीन स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर चालेल. Google हे पण मान्य करत आहे की हा फोन फक्त भारतीय बाजारासाठी बनवला जात आहे आणि हा 2019 च्या पहिल्या सहामाहीत लॉन्च केला जाऊ शकतो. याआधी असे काहीच समोर आले नव्हते.
मागच्या महिन्यात, क्वालकॉम ने स्नॅपड्रॅगन 710 मोबाईल प्लॅटफार्म चे अनावरण करून नवीन स्नॅपड्रॅगन 700-सीरिज चिपसेट ची सुरवात केली. अंदाज लावला जात आहे की ही रेंज स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट च्या वर आहे पण स्नॅपड्रॅगन 800-सिरीज चिपसेट च्या खाली. हा 10 एनएम लिथोग्राफी प्रक्रिया वर बनवण्यात आला आहे आणि नवीन क्रियो 360 प्रोसेसर ला नियोजित करतो. हा ऑन-डिवाइस टेक्निकल नेटवर्क मिळवण्यासाठी एक बहु-कोर एआर इंजिन सह येतो. क्वालकॉम टेक्नोलॉजीज चे उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष केदार कोंडाप सांगतात, "स्नॅपड्रॅगन 710 मोबाईल प्लॅटफार्म महत्वपूर्ण 700-सीरिज मधला पहिला आहे, जो आमच्या प्रीमियम-स्तरीय मोबाईल प्लॅटफार्म वरील सुविधां सह येतो."
पिक्सल फोन व्यतिरिक्त, Google यावर्षी आणि आणि पुढील लॉन्च ची योजना बनवत आहे, सर्च इंजन जायंट कडून अपेक्षित अन्य डिवाइस एक नवीन Google पिक्सलबुक, स्मार्ट स्पीकर्स आणि आईओटी प्रोडक्ट्स जसे की दरवाजे, कॅमेरा, स्मोक डिटेक्टर आणि अलार्म सिस्टम. हे आईओटी प्रोडक्ट्स नेस्ट ब्रांड अंतर्गत विकले जातील.
भातासाठी असलेल्या नवीन मध्य श्रेणी पिक्सल बद्दल दिलेल्या माहिती व्यतिरिक्त इतर महिती उपलब्ध नहीं. पण, भारतासाठी पिक्सल फोन बनवण्याच्या Google च्या योजनेचे कौतुक होत आहे. कारण 2019 मध्ये भारत मोबाइल विक्री मधील एक प्रमुख देश म्हणून समोर येईल.